Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळीसह गारपीट, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, आयएमडीकडून ॲलर्ट जारी

उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव, अरबी आणि बंगालच्या उपसागरातून एकत्र येणाऱ्या वाऱ्यामुळं महाराष्ट्रातील काही ठिकाणासंह मध्य भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळीसह गारपीट, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, आयएमडीकडून ॲलर्ट जारी
Nanded Rain
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 8:49 AM

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं (IMD) विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केलीय. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव, अरबी आणि बंगालच्या उपसागरातून एकत्र येणाऱ्या वाऱ्यामुळं महाराष्ट्रातील काही ठिकाणासंह मध्य भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आयएमडीनं 9 ते 13 जानेवारी पर्यंतचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार आज विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी केला आहे.

मराठवाडा विदर्भात गारपीटीची शक्यता

उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ,अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील 4-5 दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यांच्या प्रभावामुळं मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता आहे. 9 ते13 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात हलका-मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात कुठे पाऊस पडणार ?

10 जानेवारी :आयएमडीनं गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेडला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबादमध्येही पावसाची शक्यता आहे.

11 जानेवारी : यलो अ‌ॅलर्ट : गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांना लागू असेल. तर, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

नांदेडमध्ये पहाटे पाऊस

नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि देगलूर तालुक्यात आज पहाटे हलक्या पावसाने हजेरी लावलीय, या हलक्या पावसामुळे जिल्हाभरात काहीसा गारठा वाढलाय. या पावसाने शेतात असलेल्या तुरीच्या पिकाला फटका बसणार आहे, तसेच आंबा आणि इतर फळबागांना देखील या पावसाने नुकसान होणार आहे.

अवकाळीचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका

आगामी दोन दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि आर्थिक संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं आणखी एकदा नुकसान होण्याची भीती आहे.काल झालेल्या गारपीटीमुळं वर्धा जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

इतर बातम्या:

बॉयलरची सफाई करताना हलगर्जी, पुण्यात उकळतं पाणी पडून चौघे भाजले, एकाचा मृत्यू

मोठी बातमी: मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत, अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2 हजार घरे, नेमकी कुठे आहेत ही घरं?

Weather Forecast imd predicted unseasonal rain due to western disturbance Marathwada and Vidarbha in two days issue yellow and Orange alert

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.