Weather Forecast : डिसेंबरची सुरुवात अवकाळीनं आणि शेवटही, 28, 29 डिसेंबरला पावसाची हजेरी, यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीनं राज्यात येत्या 29 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे

Weather Forecast : डिसेंबरची सुरुवात अवकाळीनं आणि शेवटही, 28, 29 डिसेंबरला पावसाची हजेरी, यलो अलर्ट जारी
weather (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 1:57 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीनं राज्यात येत्या 27 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारपासून ( 26 डिसेंबर ) वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात 28-29 डिसेंबरला काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

के. एस. होसाळीकर यांचं ट्विट

राज्यात कुठं पाऊस पडणार

हवामान विभागानं 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अॅलर्ट जारी केले आहेत. राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) शक्यता आहे. 27 ला विर्दभात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

29 डिसेंबरला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज

नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.

नांदेडमध्ये थंडीचा जोर वाढला

गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळच्या सुमारास वातावरणात कडाक्याची थंडी जाणवली .वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक व पोषक ठरत आहे. गव्हाच्या ओंब्या धरण्याच्या अवस्थेत असलेल्या गव्हाला आणि फुले व घाटे धरण्याच्या अवस्थेतील हरभरा पिकाला थंडी फायदेशीर ठरत आहे.

निफाडमध्ये तापमान घटलं

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.5 अंश सेल्शिअस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या सात-आठ दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून किमान तापमानात चढ-उतार होत असल्याने ख्रिसमसच्या दिवशी आज निफाड तालुका थंडीने गारठून निघाला आहे. या थंडी पासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू उब मिळवायचा प्रयत्न नागरिक करीत आहे. या वाढत्या थंडीमुळे द्राक्षबागेतील फुगवणी आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याच्या भीती मुळे द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपले द्राक्षबाग वाचवण्यासाठी ठिकाणी द्राक्षबागेत शेकोट्या पेटवल्या जात आहे.

इतर बातम्या:

मुंबईकरांनो तुमचं काळीज कोण काळं करतंय? माझगाव, कुलाब्यात घातक कणाचं प्रमाण वाढलं, मुंबईचा श्वास मोकळा कसा होणार?

औरंगाबाद महापालिकेचा स्वतंत्र हवामान विभाग, पुढील 30 वर्षांचा हवामान आराखडा आखणार, जागतिक संस्थेशी करार

Weather Forecast imd predicted unseasonal rain North Maharashtra Marathwada and Marathwada

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.