Mumbai Rains: मुंबईवर अद्यापही मुसळधार पावसाचं सावट, आकाशात काळ्या ढगांची गर्दी

मुंबईत येत्या काही तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. | Mumbai weather rain

Mumbai Rains: मुंबईवर अद्यापही मुसळधार पावसाचं सावट, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
पाऊस
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 8:14 AM

मुंबई: तौक्ते चक्रीवादळ निघून गेल्यानंतरही मुंबईत मंगळवारी पावसाची शक्यता आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांसह आजुबाजूच्या परिसरातील आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. अधूनमधून पावसाच्या (Mumbai Rains) तुरळक सरीही बरसत आहेत. याशिवाय, वारेही (Wind) नेहमीपेक्षा वेगाने वाहत आहेत. वातावरणाचा एकूणच नूर पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Weather updates Mumbai and suburban region)

तौक्ते चक्रीवादळामुळे सोमवारी दिवसभर मुंबई, उपनगर आणि ठाण्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला होता. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. आजही अशाचप्रकारेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दादरमध्ये पाणी साचलं

दादर टीटी परिसरात आज पहाटेपासून बरसत असलेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. आजही दक्षिण मुंबई मुसळधार पाऊस झाल्यास हा परिसर पूर्णपणे जलमय होण्याची शक्यता आहे.

वसई-विरार आणि नालासोपऱ्यात जोरदार पाऊस

वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. काल दिवसभरात चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. परिणामी अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. सलग पडणाऱ्या पावसाने शहरातील अनेक सखल भागांत दोन फूट पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नालासोपारा निलेमोरे गाव, वसई समता नगर, नवजीवन, सतीवली, विरार विवा कॉलेज रोड यासह अन्य भागात काही प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबईत पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

मुंबईत मंगळवारी दिवसभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबईत येत्या काही तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईवरील धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही.

संबंधित बातम्या:

मुंबईतल्या अरबी समुद्राचं असं रुप जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल, सर्वाधिक पाहिला जाणारा Video

Mumbai rains and weather update : मुंबईत 24 तासात अतिवृष्टीची शक्यता, 120 किमी वेगाने वारं वाहणार

Photo Story: ‘तौक्ते’चा तडाखा, मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली, सी-लिंक बंद; विमानांचे उड्डाणही थांबवले

(Weather updates Mumbai and suburban region)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.