लॉकडाऊनमध्ये लगीनघाई, नगरमध्ये बस्ता बांधण्यासाठी गेलेल्या 18 वऱ्हाडींवर कारवाई

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात लॉकडाऊन घोषित केला (Wedding shopping during lockdown ahmednagar) आहे.

लॉकडाऊनमध्ये लगीनघाई, नगरमध्ये बस्ता बांधण्यासाठी गेलेल्या 18 वऱ्हाडींवर कारवाई
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 5:10 PM

अहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात लॉकडाऊन घोषित केला (Wedding shopping during lockdown ahmednagar) आहे. या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद केल्या आहेत. असे असतानाही लॉकडाऊनमध्ये अहमदनगरमधील पाथर्डी शहरातील एका कुटुंबाने कोरोनाचे सर्व निर्बंध मोडून चक्क कपड्यांच्या दुकानात जाऊन लग्नाचा बस्ता बांधला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन 18 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल (Wedding shopping during lockdown ahmednagar) केला.

लॉकडाऊनसह राज्यात संचारबंदी असतानाही पाथर्डीमधील कुटुंबाकडून सर्व नियम मोडून लग्नाचा बस्ता बांधल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या गुप्त माहितीव्दारे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर गर्जे, अनिल बडे, जयदत्त बांगर, नारायण कुटे, प्रदीप बोरुडे या पथकाने ही कारवाई केली.

राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांचे लग्न होते त्या लोकांनी आपले लग्न पुढे ढकलले तर काहींनी घरातच लग्न केले. विशेष म्हणजे काहींनी तर ऑनलाऊन फेसबुक लाईव्ह, व्हिडीओ कॉलद्वारे लग्न सोहळा पार पाडला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकही धार्मिक कार्यक्रम, कौटुंबिक कार्यक्रम साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी आपली लग्नं साध्या पद्धतीने घरातच केली आहेत.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 4666 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात 18 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळे साखरपुड्यातच लग्न उरकलं, वाचलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.