Nandurbar : आरोग्य संघटनेचे पदाधिकारी थेट आदिवासी विकास मंत्र्यांच्या दारी, नेमक्या मागण्या काय?

जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून येथील समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतील पदाधिकाऱ्यांचीच कोंडी केली जात आहे. शिवाय शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोई-सुविधा देखील देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या अन्यायाविरोधात आता लढा उभा केला जात आहे.

Nandurbar : आरोग्य संघटनेचे पदाधिकारी थेट आदिवासी विकास मंत्र्यांच्या दारी, नेमक्या मागण्या काय?
जिल्हा आरोग्य विभागाकडून अन्याय होत असल्याने आरोग्य संघटनेचे पदाधिकारी थेट आदिवासी विकास मंत्र्यांच्या दारी पोहचले होते.
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 10:11 PM

जितेंद्र बैसाने टीव्ही 9 नंदुरबार : जिल्हा आरोग्य प्रशासनाचा मनमानी कारभार हा काही आता लपून राहिलेला नाही. याचा त्रास केवळ रुग्ण आणि रुग्ण नातेवाईकांनाच होतो असे नाही तर येथील आरोग्य अधिकाऱ्यांचीही यामधून सुटका झालेली नाही. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून होणाऱ्या आर्थिक अन्यायाविरुद्ध समुदाय आरोग्य अधिकारी यांनी थेट आदिवासी विकास मंत्री मा.डॉ.विजयकुमार गावित आणि खा. डॉ. हीनाताई गावित यांच्या दारी जाऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. शिवाय होत असलेली पिळवणूक थांबवावी अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे.

जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून येथील समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतील पदाधिकाऱ्यांचीच कोंडी केली जात आहे. शिवाय शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोई-सुविधा देखील देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या अन्यायाविरोधात आता लढा उभा केला जात आहे.

या आहे मागण्या

* शासानाच्या नियमानुसार महिन्याच्या 5 तारखेपर्यंत बेसक वेतन आणि 10 तारखेपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देणे बंधनकारक आहे. शिवाय अतिदुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्यास अधिकचा भत्ता देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

* दोन-दोन महिने वेतन हे राखून ठेवले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येते. गेल्या अनेक दिवसांपासून असेच धोरण राबवले जात आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी आता या संघटनेतील पदाधिकारी करीत आहेत.

* कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी 5 टक्के ही वाढ ठरलेली आहे. असे असताना 3 वर्ष उलटले तरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची वाढ मिळालेली नाही. वाढीव वेतन सोडा आहे ते वेतनही वेळेत दिले जात नाही.

* इंन्सेंटीव्ह मधील काही इंडिकेटर हे ऑफलाईन आहेत. असे असतानाही कर्मचाऱ्यांचा मोबदला हा कपात केला जात आहे. तर आरोग्य सेवा देण्यासाठी अपुऱ्या साधन सामग्री आहेत.

* शासनाच्या नियमानुसार 15 इंडिकेटरनुसार कार्य होणे गरजेचे आहे. यापेक्षा अतिरिक्त कामाचा भार देऊनही अपेक्षित वाढ केली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.