अखेर अजित पवार यांनी बाबा आढाव यांना काय शब्द दिला?; आंदोलन चिरडण्यावर मोठं भाष्य काय?

बाबा आढव यांनी सध्या पुण्यात आंदोलन सुरु केलं आहे. ईव्हीएमच्या विरोधात त्यांचं हे आंदोलन आहे. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप त्यांनी केलाय. विरोधकांनी त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांची आज भेट घेत त्यांना शब्द दिलाय. काय म्हणाले अजित पवार जाणून घ्या.

अखेर अजित पवार यांनी बाबा आढाव यांना काय शब्द दिला?; आंदोलन चिरडण्यावर मोठं भाष्य काय?
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 3:58 PM

बाबा आढावा यांनी पुण्यात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला इतकं मोठं यश कसं मिळालं यामध्ये नक्कीच काही तरी घोटाळा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. बाबा आढाव यांनी पुण्यात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरु केलंय. अनेक विरोधकांनी त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार हे देखील आज बाबा आढाव यांची भेट घेण्यसाठी पोहोचले. अजित पवार यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केलीये.

आंदोलन दडपू नका, तसा शब्द द्या – बाबा आढाव

बाबा आढाव यांनी यावेळी म्हटले की, कोर्टात मार्ग निघत नाही म्हणून जनआंदोलन केलं जातं. त्याने केलं म्हणजे आम्ही केलं असं होत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. फक्त ते दडपू नका. तसा शब्द द्या. आतापर्यंत खूप दडपण्याचा प्रयत्न केला. कोर्टाच्या जजपेक्षा मला जनतेची न्यायबुद्धी महत्त्वाची आहे. आमचं आंदोलन चिरडलं जाऊ नये. नाही तर चिघळलं जाईल. चळवळी उभ्या करणं आमचं काम आहे. हे आंदोलन सुरू झालं. त्यात विधायक बाजू आहे. चळवळीच्या हक्काच्या बाजू आहेत. ते चिरडलं जाऊ नये. अशी विनंती त्यांनी अजित पवार यांना केली.

आंदोलन चिरडलं जाणार नाही – अजित पवार

‘यावेळी अजित पवारांनी त्यांना शब्द दिला की, आंदोलन हे चिरडलं जाणार नाही. त्यांना मी विनंती केलीच आहे. आंदोलन मागे घेण्याची. उद्धव ठाकरे येणार आहेत. इतर नेतेही येणार आहेत. मी कलेक्टर, सीपी आणि सर्व अधिकारी आणले. त्यांनाही सांगेल. आंदोलन चिरडलं जाणार नाही. आमच्याकडून असं काही होणार नाही’

बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी

‘बॅलेट पेपरवर मतदानाच्या मागणीवर अजित पवार म्हणाले की, यावर अनेकवेळा चर्चा झालीये. आपण संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मानतो. कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही काय करणार आहे. उलट बॅलेटपेपरवर गंमत असायची. आम्ही ९१ची निवडणूक बॅलेट पेपरवर लढवली. उलट मशीनवर चांगलं आहे. कुणाला किती मिळाले पटकन कळतं. आम्ही काही मशीनचा आग्रह धरला नाही. बॅलेट पेपरवर घेतली तरी आम्हाला काही अडचण नाही. पण कोर्टानेच निर्णय दिला आहे. तो त्यांचा अधिकार आहे.’

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.