नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी एका तासात हजारो रुपये जमा, व्हॉट्सअ‍ॅपचा सदुपयोग

एरवी सोशल मीडियाचा दुरुपयोग झाल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर येत असतात. मात्र, सोशल मीडियाचा किती सुंदर आणि समाजोपयोगी वापर होऊ शकतो, हेच 'जिवलग' व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने दाखवून दिले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी एका तासात हजारो रुपये जमा, व्हॉट्सअ‍ॅपचा सदुपयोग

हिंगोली : सोशल मीडिया म्हटल्यावर चांगलं काही घडलेलं असेल, अशी शक्यताच दिवसागणिक मावळत चालली आहे. अनेक नकारात्मक आणि निराशाजनक उदाहरणं सोशल मीडियाशी संबंधित वाचनात, पाहण्यात येत असताना, हिंगोलीत सोशल मीडियाबाबत सकारात्मक चित्र पाहायला मिळालं. व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अॅपचा अत्यंत चांगला वापर करत, हिंगोलीतील तरुणांच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने नुकसानग्रस्त तरुण शेतकऱ्याला आर्थिक आधार दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासू वादळवारा सुरु आहे. या वादळवाऱ्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील रेशीम शेती करणाऱ्या सुदर्शन शिंदे या तरुण शेतकऱ्याचे शेड कोसळलं. या घटनेत सुदर्शन शिंदे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं.

सुदर्शन शिंदे या तरुण शेतकऱ्याला या घटनेवेळी आधार देण्यासाठी काही तरुण पुढे आले. ‘जिवलग’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील हे तरुण आहेत. यांनी ग्रुपवर सुदर्शनला मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर अवघ्या तासाभरात हजारो रुपयांची मदत जमा झाली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अगदी नावाप्रमाणेच तरुण शेतकऱ्यासाठी ‘जिवलग’ ठरला.

‘जिवलग’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अॅडमिनसह सर्व सदस्यांचं आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे आणि खऱ्या अर्थाने या तरुणांचं काम कौतुकास्पद सुद्धा आहे.

एरवी सोशल मीडियाचा दुरुपयोग झाल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर येत असतात. मात्र, सोशल मीडियाचा किती सुंदर आणि समाजोपयोगी वापर होऊ शकतो, हेच ‘जिवलग’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने दाखवून दिले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *