तुळापुरात अमोल कोल्हे-शिवाजी आढळराव एकमेकांना भेटतात तेव्हा....

पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 330 व्या बलिदान दिनी आज तीर्थक्षेत्र वढू – तुळापूर इथे अनेकांनी हजेरी लावून, महाराजांच्या समाधीला मानवंदना दिली. मोठ्या संख्येने शिव-शंभू भक्त याठिकाणी उपस्थित होते. निवडणुकीच्या धामधुमीत इथे एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात एकमेकांविरोधात उभा ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव …

तुळापुरात अमोल कोल्हे-शिवाजी आढळराव एकमेकांना भेटतात तेव्हा....

पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 330 व्या बलिदान दिनी आज तीर्थक्षेत्र वढू – तुळापूर इथे अनेकांनी हजेरी लावून, महाराजांच्या समाधीला मानवंदना दिली. मोठ्या संख्येने शिव-शंभू भक्त याठिकाणी उपस्थित होते. निवडणुकीच्या धामधुमीत इथे एक अनोखं चित्र पाहायला मिळालं.

लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात एकमेकांविरोधात उभा ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे समोरासमोर आले. दोघेही संभाजी महारांच्या समाधीला वंदन करण्यासाठी आले होते. एकमेकांचे विरोधक एकमेकांसमोर एकाचवेळी एकाच ठिकाणी आल्याने दोघांनाही अवघडल्यासारखं झालं. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश बापटही उपस्थित होते.

वाचा – उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कोल्हेंचं पहिलं भाषण

सर्वात आधी अमोल कोल्हे आणि गिरीश बापट हे समोरासमोर आले. त्यावेळी गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली. त्यानंतर अचानक शिवाजीराव आढळराव पाटीलही तिथे आले. त्यावेळी अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकमेकांचे हात हातात घेत हस्तांदोलन केलं.

अमोल कोल्हे-आढळराव आरोप प्रत्यारोप

दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अमोल कोल्हे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आहेत. राष्ट्रवादीने त्यांना शिरुरमधून उमेदवारी दिली. त्यानंतर या दोघांमध्ये प्रचंड आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

माझी जात विचारु नका मी छत्रपतींचा मावळा आहे, असं प्रत्युत्तर शिवसेनेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिलं. ते जुन्नरमध्ये बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नाही तर माळी म्हणून निवडणुकांच्या मैदानात उतरवत आहे अशी टीका शिवसेनेच्या आढळराव पाटील यांनी केली होती. त्याला अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं.

संबंधित बातम्या

आढळराव, माझी जात लिहून घ्या…: अमोल कोल्हेंचा हल्लाबोल 

खेड विमानतळ जागेवरुन अमोल कोल्हेंचा आढळरावांवर गंभीर आरोप   

अमोल कोल्हेंविरोधात टीका करताना भान बाळगा : खासदार आढळराव पाटील  

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकात अमोल कोल्हे विसाव्या क्रमांकावर, पहिला कोण?  

चाकणमध्ये अमोल कोल्हेंची जाहीर सभा   

शिरुरमध्ये विलास लांडेंना डावललं, अमोल कोल्हेंविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *