दरवर्षी उन्हाळ्यात कोयनेतून कर्नाटकला पाणी, उपकाराची जाण कानडी विसरले?

कर्नाटकने महाराष्ट्राच्या उपकाराची जाण ठेवावी. महाराष्ट्र सरकार दरवर्षी कोयना धरणातून कृष्णा नदीच्या माध्यमातून दुष्काळी कर्नाटकाला पाणी सोडतं.

दरवर्षी उन्हाळ्यात कोयनेतून कर्नाटकला पाणी, उपकाराची जाण कानडी विसरले?
Follow us
| Updated on: Aug 09, 2019 | 5:32 PM

मुंबई : सांगली आणि कोल्हापूरला पुराने वेढा दिला आहे. पावसाची संततधार, पात्रं सोडून वाहणारे पाणी, धरणातून होणारा विसर्ग यामुळे पूर हटायचं नाव घेत नाही. त्यातच कर्नाटकातील अलमट्टी (Almatti Dam) धरणातून पाण्याचा म्हणावा तसा विसर्ग न झाल्याने, त्या (Almatti Dam) धरणाच्या बॅकवॉटरचा फटका सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसतो. महाराष्ट्र सरकारने सातत्याने विसर्ग वाढवण्याची मागणी करुनही, कर्नाटक सरकार अडेलतट्टूपणा करत पाणी सोडण्यास कुचराई करत आहे.

अशा परिस्थिती कर्नाटकने महाराष्ट्राच्या उपकाराची जाण ठेवावी. महाराष्ट्र सरकार दरवर्षी कोयना धरणातून कृष्णा नदीच्या माध्यमातून दुष्काळी कर्नाटकाला पाणी सोडतं. यंदाही मे महिन्यात कर्नाटकचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी येऊन, दुष्काळी जिल्ह्यांना कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती केली होती. माणुसकीच्या दृष्टीने महाराष्ट्रानेही कर्नाटकला पाणी सोडण्याचं मान्य केलं होतं.

त्यावेळी महाराष्ट्राने कोयना धरणातून 2 टीएमसी आणि दूधगंगा धरणातून 1 टीएमसी पाणी कर्नाटकला  सोडले होते. तसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

कर्नाटकचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं होतं. या शिष्टमंडळामध्ये खासदार प्रभाकर कोरे, आमदार शशिकला जोल्ले, आमदार पी राजीव, आमदार महांतेश कवटगीमठ, लक्ष्मण सौदी, सिद्धू सौदी तसेच अण्णासाहेब जोल्ले यांचा समावेश होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच दुष्काळी जनतेला दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

कर्नाटकातील सीमाभागासह बागलकोट, विजापूर जिल्ह्यांना लाभदायक ठरणार्‍या कृष्णा नदीत कोयनेतून दोन टीएमसी पाणी सोडू, अशी ग्वाही महाराष्ट्र सरकारने कर्नाटकाला दिली होती. तसे पत्र महाराष्ट्राच्या सचिवांनी कर्नाटकाच्या सचिवांना पाठवले होते. माणुसकीच्या दृष्टीने महाराष्ट्राने कोयना धरणाचे पाणी कृष्णा नदीत सोडले होते.

प्रचंड उन्हामुळे कर्नाटक भागात कृष्णा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे सीमाभागातील बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होतं. केवळ माणसेच नव्हे तर जनावरांनाही पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होतं. कर्नाटकातील परिस्थिती गंभीर बनली होती. त्यामुळे बेळगाव, बागलकोट जिल्ह्यांतील काँग्रेस, भाजप लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती.

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय बाजूला ठेवून, महाराष्ट्रा सरकारने तहानेने व्याकूळ कर्नाटकला पाणी सोडलं होतं. मात्र आज महाराष्ट्र  पुरात बुडाला असताना, कर्नाटक सरकार मात्र अडेलतट्टूपणा करत आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.