Raksha Bandhan 2022: तब्बल 200 वर्षानंतर आलाय विचित्र योग; रक्षाबंधन दिवशी भावाच्या हातात राखी बांधण्यासाठी फक्त दीड तासांचा मुहूर्त

तब्बल दोनशे वर्षानंतर आलेल्या या विचित्र ग्रहयोग जुळून आला आहे. यामुळे यंदा रक्षाबंधन नेमके केव्हा करावे या बद्दल संभ्रम निर्माण निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे गुरूवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:39 पासून श्रावण पौर्णिमा चालू होते. याच दरम्यान सकाळी 10:39 ते रात्री 08:51 पर्यंत भद्रा आहे. भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे बंधुराजाला राखी केव्हा बांधावी असा प्रश्न महिलांना पडला आहे.

Raksha Bandhan 2022: तब्बल 200 वर्षानंतर आलाय विचित्र योग; रक्षाबंधन दिवशी भावाच्या हातात राखी बांधण्यासाठी फक्त दीड तासांचा मुहूर्त
Raksha Bandhan
Image Credit source: TV9
वनिता कांबळे

|

Aug 10, 2022 | 11:58 PM

नवी दिल्ली : बहिण भावाच्या पवित्र नात्याचा प्रतिक असणारा सण म्हणजे रक्षाबंधन(Raksha Bandhan 2022). या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. तर बंधुराज देखीलही बहिणाबाईंना आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतात. यामुळे रक्षाबंधनच्या सणाला विशेष महत्त्व असते. नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. यंदाच्या नारळी पौर्णिमेला मात्र विचित्र योग जुळून आला आहे. यामुळे रक्षाबंधनासाठी फक्त दीड तासांचा मुहूर्त आहे. या दीड तासात रक्षाबंधन साजरे करणे शुभ मानले जाणार आहे. तब्बल दोनशे वर्षानंतर असा विचित्र योग आला आहे.

रक्षाबंधन नेमके केव्हा साजरे करावे या बद्दल संभ्रम

तब्बल दोनशे वर्षानंतर आलेल्या या विचित्र ग्रहयोग जुळून आला आहे. यामुळे यंदा रक्षाबंधन नेमके केव्हा करावे या बद्दल संभ्रम निर्माण निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे गुरूवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:39 पासून श्रावण पौर्णिमा चालू होते. याच दरम्यान सकाळी 10:39 ते रात्री 08:51 पर्यंत भद्रा आहे. भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे बंधुराजाला राखी केव्हा बांधावी असा प्रश्न महिलांना पडला आहे.

भद्र काळात राखी बांधल्याने रावणाला त्याच्या बहिणीचे रक्षण करता आले नाही

भद्रा ही शनिदेवाची बहीण असल्याचा ग्रंथा मध्ये उल्लेख आहे. लंकापती रावणाला त्याची बहीण शुर्पणका हिने भद्रा काळात राखी बांधली आणी वर्ष भरात रावणाचा अंत झाला. भद्र काळात राखी बांधल्याने रावणाला त्याच्या बहिणीते रक्षण करता आले नाही. भद्र काळाबाबत अनेक दंतकथा असल्याचे ज्योतिषी श्री वेद मूर्ती संतोष राजाभाऊ जोशी गुरुजी यांनी सांगीतले.

रक्षाबंधन दिवशी तिथी, नक्षत्र आणि दिवसाचा शुभ योगायोग

11 ऑगस्टला पौर्णिमा तिथी आणि श्रवण नक्षत्रासह गुरुवारचा शुभ संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रात या योगाचे वर्णन खरेदीसाठी शुभ मुहूर्त म्हणून करण्यात आले आहे. ज्यामध्ये वाहने, मालमत्ता, दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर गोष्टींची खरेदी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. तसेच, कोणत्याही नवीन सुरुवातीसाठी हा दिवस खूप चांगला असेल. या दिवशी नोकरी, मोठे व्यवहार किंवा गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. श्रावण नक्षत्र असल्याने वाहन खरेदीसाठी संपूर्ण दिवस अतिशय शुभ राहील.

11 ऑगस्ट रोजी रात्री 8.25 नंतरच रक्षाबंधन साजरे करावे

11 ऑगस्ट रोजी पौर्णिमा रात्री 9:35 वाजता सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी सकाळी 7.16 पर्यंत राहील. दुसरीकडे, भाद्रा गुरुवारी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल आणि रात्री 8.25 वाजता संपेल. त्यामुळे काशी विद्या परिषदेसह उज्जैन, हरिद्वार, पुरी आणि तिरुपती येथील विद्वानांचे म्हणणे आहे की, भद्राचा वास आकाशात असो वा स्वर्गात, भद्राचा काळ पूर्ण होईपर्यंत रक्षाबंधन करू नये. त्यामुळे गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी रात्री 8.25 नंतरच रक्षाबंधन साजरे करावे, असे सर्व ज्योतिषी एकमताने सांगतात.

भद्र काळात रक्षाबंधन करणे अशुभ

काही लोकांचा असा विश्वास आहे की 11 ऑगस्टला भाद्रा अधोलोकात राहील. ज्याचा पृथ्वीवर कोणताही अशुभ परिणाम होणार नाही. त्यामुळे रक्षाबंधन पूर्ण दिवस करता येते, पण कोणत्याही ग्रंथात किंवा पुराणात याचा उल्लेख नाही, असे विद्वान परिषदेचे म्हणणे आहे. त्याचबरोबर ऋषीमुनींनी संपूर्ण भाद्र काळात रक्षाबंधन आणि होलिका दहन करणे अशुभ सांगितले आहे. त्यामुळे भद्राच्या वास्तव्याचा विचार न करता राखी पूर्णपणे पार पडल्यानंतरच बांधावी. त्याच वेळी, 12 तारखेला पौर्णिमा तिथी पहाटे फक्त 2 तासांसाठी असेल आणि प्रतिपदेला राहील. या योगातही रक्षाबंधन करण्यास मनाई आहे.

प्रदोष काळात रक्षाबंधन शुभ

रक्षाबंधनाच्या संदर्भात ग्रंथांमध्ये प्रदोष काळ सर्वोत्तम मानला गेला आहे, असे विद्वानांचे म्हणणे आहे. म्हणजेच सूर्यास्तानंतरची सुमारे अडीच तासांची वेळ अत्यंत शुभ असते. दिवाळीत या काळात लक्ष्मीपूजन केले जाते. यासोबतच प्रदोष काळात होलिका आणि रावण दहन करण्याची प्रथा आहे. यावेळी केलेल्या कामाचा शुभ प्रभाव दीर्घकाळ राहतो असे ज्योतिष ग्रंथात सांगितले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें