असं वाटतंय तलवार घेऊन मुंडकी छाटून टाकू… उदयनराजे भोसले संतापले…

मी लढणारा आहे, मी रडणारा नाही, मी त्या दिवशी भावुक झालो होतो, शिवाजी महाराजांचा अवमान होता कामा नये नाहीतर नावच पुसून टाका म्हंटल्यावर मी भावुक झाल्याचे उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

असं वाटतंय तलवार घेऊन मुंडकी छाटून टाकू... उदयनराजे भोसले संतापले...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 3:33 PM

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलतांना उदयन राजे म्हणाले असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावी असं आक्रमकपणे म्हणत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का ? शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते असे थेट सुनावत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. सातारा येथे उदयनराजे यांनी हे विधान केले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यावर सगळे शांत बसले असले तरी मी शांत बसू शकत नाही. मी एक शिवभक्त आहे आणि त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही असे म्हणत उदयनराजे पुन्हा एकदा आज भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सातारा येथे माध्यमांशी बोलत असतांना उदयनराजे यावेळी भडकल्याचे देखील पाहायला मिळाले.

मी लढणारा आहे, मी रडणारा नाही, मी त्या दिवशी भावुक झालो होतो, शिवाजी महाराजांचा अवमान होता कामा नये नाहीतर नावच पुसून टाका म्हंटल्यावर मी भावुक झाल्याचे उदयनराजे यांनी म्हंटले आहे.

याशिवाय मी आज रायगडला जाणार आहे. उड्या शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन माझी भावना व्यक्त करणार आहे. त्यावेळी तिथं सगळंच बोलतो असा इशारा देखील उदयनराजे यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

वारंवार महाराजांचा होणारा अपमान, त्याला होणाऱ्या समर्थनावर उदयनराजे यांनी स्पष्टच सुनावलं आहे. लोकं कोडगी झाली आहेत. सोईप्रमाणे होणारा वापर हे चालणार नाही.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपप्रवक्ते त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधाने केली आहे.

एकूणच उदयनराजे यांनी रायगड येथे जाऊन आपली व्यथा मांडणार असल्याचे जाहीर केले असले तरी दुसरीकडे असं वाटतंय एक-एकाची मुंडकी छाटावी असं म्हंटलं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.