राजेंबाबत पवार साशंक की पवारांबाबत राजे साशंक?

नवी दिल्ली: साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले प्रिंट मीडियातील निवडक पत्रकारांना घेऊन दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी खुमासदार चर्चाही शरद पवार आणि पत्रकारांसोबत रंगली होती. ती चर्चा अशी रंगली.- शरद पवार- तुमचं काय, काय मोहीम होती ? पत्रकार- दिल्ली फिरायचं होतं, संसद बघायची होती, तुमची भेट घ्यायची …

राजेंबाबत पवार साशंक की पवारांबाबत राजे साशंक?

नवी दिल्ली: साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले प्रिंट मीडियातील निवडक पत्रकारांना घेऊन दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी खुमासदार चर्चाही शरद पवार आणि पत्रकारांसोबत रंगली होती. ती चर्चा अशी रंगली.-

शरद पवार- तुमचं काय, काय मोहीम होती ?

पत्रकार- दिल्ली फिरायचं होतं, संसद बघायची होती, तुमची भेट घ्यायची होती. दादांबरोबर रहायचं

शरद पवार– आता संपत आल्यावर काय बघता ?

हशा….

पत्रकार- पन्हा नवीन सुरुवात करायची

शरद पवार- आम्हांला त्यांची खात्री वाटत नाही ना?

पत्रकार- खात्री आहे, 100 टक्के आहे, ते तुमच्यासोबतच राहणार आहेत. ह्याची खात्री आहे आम्हांला.

हशा…..

शरद पवार- आम्हां लोकांची म्हटलंय मी…

हशा…..

पत्रकार- खात्री आहे, म्हणून तर ….पुढं पण कायमस्वरूपी आम्हा लोकांना येता यावं….सध्या वातावरण आहे…

या सर्व खुमासदार चर्चेत उदयनराजे मात्र फक्त बघ्याच्या भूमिकेत होते आणि निर्विकारपणे ते उभे होते. मात्र हास्यावेळी त्यांनीदेखील दिलखुलास हसत दाद दिली. पण कोणतीही  प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले भाजपात जाणार याची कुणकुण शरद पवारांना लागली की उदयनराजे पुन्हा निवडून येतीलच याची शाश्वती शरद पवारांना नाही. कारण शरद पवारांच्या विधानांचा नक्की अर्थ काय हाच प्रश्न आता तेथे उपस्थित पत्रकारांसह सर्वांनाच पडला आहे.  आता घोडा मैदान जवळच आलंय, याचा उलगडा लवकरच होईल.


संबंधित बातम्या 

हळव्या मनाचे उदयनराजे भोसले पाहिले आहेत का?  

शिवेंद्रराजेंच्या गाडीत पुढे पवार, मागे उदयनराजे!   

महिनाभरात माझं लग्न आहे : उदयनराजे भोसले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *