10 महिन्यात वीजेचं एकही बिल न भरणाऱ्यांना बसणार ‘शॉक’!

पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी एक शॉक देणारी बातमी आहे. कारण, गेल्या 10 महिन्यात वीजेचं एकही बिल न भरणाऱ्यांचं विज कनेक्शन आता कट केलं जाणार आहे.

  • भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 21:54 PM, 10 Feb 2021
10 महिन्यात वीजेचं एकही बिल न भरणाऱ्यांना बसणार 'शॉक'!

कोल्हापूर : वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असताना आता पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी एक शॉक देणारी बातमी आहे. कारण, गेल्या 10 महिन्यात वीजेचं एकही बिल न भरणाऱ्यांचं विज कनेक्शन आता कट केलं जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 14 लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार आहे. ऊर्जा विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेलं राजकारण अजून तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(If the electricity bill is not paid in the last 10 months, the connection will be disconnected)

वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील 3 आठवड्यात होणार असल्याची माहिती मिळतेय. आपले वीज कनेक्शन कायम ठेवायचे असल्यास हप्ते करुन घ्या, पण वीज बिल भरा, असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, मनसे आणि भाजपनं वाढीव वीज बिलाचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसेनं महावितरणचे कार्यालयही फोडलं होतं.

भाजपचं टाळे ठोको आंदोलन

दरम्यान, वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन भाजपनं 5 फेब्रुवारीला राज्यभरात आंदोलन केलं होतं. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी विविध शहरात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. तसंच कुठल्याही परिस्थितीत वाढीव वीज बिल न भरण्याचं आवाहन भाजपनं केलं आहे.

चुकलं तर माफ करा, पण वीज बिल भरा!

भाजपचे हे आंदोलन म्हणजे फसवणूक आहे. केंद्र सरकार आम्हाला कोळसा आणि वीज निर्मितीसाठी लागणारं साहित्य देणार का? असा सवालही राऊत यांनी विचायरलाय. भाजप आणि केंद्र सरकारच्या असंवेदनशील वागण्यामुळे महावितरण अडचणीत आहे. ग्राहक हा आमच्यासाठी देवासारखा आहे. आमचं चुकलं असेल तर माफ करा. पण वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, अशी हतबलताही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यभरात भाजपनं जे आंदोलन केलं ते फसवं ठरलं आहे. भाजपच्या या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही. 79 टक्के लोकांनी बिल भरलं असल्याचा दावा ऊर्जामंत्र्यांनी केलाय. ज्या प्रमाणे मागील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यातून बाहेर निघण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय.

संबंधित बातम्या :

5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीवर ‘टाळे ठोको’ आंदोलन; भाजप देणार आघाडी सरकारला शॉक

बिलात 50 टक्के सूट द्या, वीज कापू नका, मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला

If the electricity bill is not paid in the last 10 months, the connection will be disconnected