Devendra Fadnavis| राज्याच्या राजकारणात कोणालाच घाबरत नाही असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस, उद्घाटनाच्या कार्यक्रमांना का घाबरतात?

लोणावळ्यात पर्यटकांना आल्यावर नाव मोठे आणि लक्षण खोटे असं वाटू नये यासाठी सर्व विकासकामाचा प्लॅन केला. गेल्या 25 वर्षात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी माझ्या काळात दिला. पाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन माझ्या काळात झालं आणि उद्घाटन देखील माझ्या हस्ते होत आहे यांचा आनंद होतोय

Devendra Fadnavis| राज्याच्या राजकारणात कोणालाच घाबरत नाही असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस, उद्घाटनाच्या कार्यक्रमांना का घाबरतात?
Devendra Fadnavis

लोणावळा – राज्याच्या राजकारणात कोणालाच घाबरत नाही. असं म्हणणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एका उद्घाटनाच्या कार्यक्रम घाबरतात, अशी कबुली दस्तुरखुद्द फडणवीसांनीच दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी लोणावळ्यातील विकासकामाच्या उद्घाटनावेळी हा किस्सा सांगितला.

”मी नागपूरचा महापौर असताना , नागपुरात एक ठिकाणी स्मशानभूमीत उद्घाटनासाठी गेलो. तिथं कोनशीलेच अनावरण झालं. तिथं स्मशानभूमीच्या उद्घाटनावेळी मला पहिलं लाकूड मला ठेवायला लावलं, मग इतरांनी सरण रचलं. त्यानंतर टेम्भा (अग्नी मशाल ) हातात देऊन अग्नी ही द्यायला लावला.” फडणवीसांनी असे म्हणताच एकच हशा पिकला. त्यामुळ मला आशा उद्घाटनाला जायला भीती का वाटते ते त्यांनी स्पष्ट केलं.

सर्वाधिक निधी दिला लोणावळ्यात पर्यटकांना आल्यावर नाव मोठे आणि लक्षण खोटे असं वाटू नये यासाठी सर्व विकास कामाचा प्लॅन केला. गेल्या 25 वर्षात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी माझ्या काळात दिला. पाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन माझ्या काळात झालं आणि उद्घाटन देखील माझ्या हस्ते होत आहे यांचा आनंद होतोय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार याचं डबल इंजिनच सरकार होत त्यामुळे आम्ही योजना सुरू करू शकलो अशी कबुलीही त्यांनी दिली. यापुढेही लोणावळा ते राजमाची धर्मचा रोप वे संदर्भात पुढाकार घेणार ,त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल असे मतही त्यांनी व्यक्त केलं.

राज्य सरकार तकलादू कारणं देतंय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आपण चालतोय. त्याचा प्रसार पुढे ही होत रहावं, म्हणून शासनाकडून त्यांचे खंड प्रकाशित केले जातात. अल्पदरात ती विक्री केली जायची. पण आता डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले सारख्या युगपुरुषांचे साहित्य प्रकाशन बंद केलंय. त्यामुळेच न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. राज्य सरकार तकलादू कारणं देतंय. मी मागणी करतो, की त्यांच्या खंड प्रकाशन सुरू करावे, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार कामगिरीवर बोलताना फडणवीस म्हणाले ,’ हे कन्फ्युजड सरकार आहे, कोणावर कारवाई करायचं हे त्यांना कळत नाही. जे खरे आरोपी आहे त्यांच्यावर कारवाई करायला मागे पुढे पहातात. सद्यस्थितीला राज्यात सरकार आहे पण शासन नाही. कुठल्या प्रकारचा फोक्स , राज्यात नवीन कामे होताना दिसत नाहीत. दारूवरचे कर कमी करत आहेत पण डिझे वरचे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

भ्रष्ट लोकांवर कारवाई कधी

जे लोक या सरकारवर बोलत आहेत. त्यांच्यावर हे सरकार करावाई करत आहे. सरकारमधील जे भ्रष्ट लोक आहेत त्याच्यावर कोना कारवाई कधी करणार असा सवाल ही फडणवीसांनी केला. माझ्या कार्यक्रमाचे कुणी अवैध फ्लेक्स लावले असतील तर ते महापालिकेने काढून टाकावे मत त्यांनी अवैध फ्लेक्स बाजीवर उत्तर देताना केले.

Nagpur Court कागदोपत्री बनविले हिंदू मुलीला मुस्लीम, ती हिंदूच असल्याचा कोर्टाचा निर्वाळा, वाचा काय आहे प्रकरण?

काय सांगता! तुमच्याकडेही 500 रुपयांची जुनी नोट आहे, मग तुम्हाला 10 हजार मिळणार, पण कसे?

केंद्राविरोधात राज्याचा शड्डू, मंत्री देसाईंची घोषणा; मराठीच्या अभिजाततेसाठी जनतेच्या न्यायालयात लढा, राष्ट्रपतींकडे याचिका

Published On - 3:09 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI