अजित पवारांना 1991 मध्ये 6 महिन्यातच का द्यावा लागला होता खासदारकीचा राजीनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार यांनी राज्यात सरकारमध्ये असताना अनेक महत्त्वच्या पदं भूषवली आहेत. कधी ते विरोधीपक्ष नेते होते तर कधी उपमुख्यमंत्री. पण अजित पवार हे खासदार पण राहिले आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे. पण त्यावेळी सहा महिन्यातच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी सांगितले की, ‘1991 मध्ये मी तरुण वयात खासदार झालो. प्रफुल्ल पटेल दिल्लीत रमले. पण मला राज्याच्या मातीचा गधं घेता आला त्याचा आनंद आहे. मला 6 महिन्यात राजीनामा द्यावा लागला होता. ते राजकारण वेगळे होते. आता सांगत नाही. पण महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत नाही, तोपर्यंत सबलीकरण होणार नाही. सामाजिक जीवनात निर्णय घेण्याचे स्वतंत्र असावे. मला विकास करायचा आहे. लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. 17 तारखेला 3 हजार तुमच्या खात्यावर जमा होतील. 6 हजार कोटींच्या फाईल वर सही केली आणि इथे आलो. रिकाम्या हाती येण्याची मला सवय नाही. महिलांच्या हातात येणारा पैसा बाजार पेठेत येणार आहे, अर्थव्यवस्थाला गती मिळणार आहे. पण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले यावर टीका करताय.’
दीड रुपयाही न देणारे टीका करताय – अजित पवार
अजित पवार म्हणाले की, ‘तुम्ही सरकार मध्ये असताना दीड रुपया दिला नाही. तुम्ही काय मला सांगतात दीड हजार देताय. देण्याची धमक असली पाहिजे. कुटुंब एक किंवा दोनवर थांबवा, उगाच फाफटपसार नको. देवाची कृपा म्हणतात, कोणाची कृपा मला महिती नाही का, मीही त्यातूनच गेलो, आत बाकी बोलत नाही, एखादा शब्द बाहेर पडेल. मी इथे आली आशुतोष म्हणाला पुढे गाडी आहे, थोडे चालू, इथपर्यंत आलो गाडी आली नाही, चालून पाय खराब, कपडे खराब झाले.’
24 तास काम करणारे आमचे सरकार
‘मागच्या निवडणुकीत आशुतोष काळेला कसंबसं निवडून दिले. 3 हजार कोटी रुपयांचा निधी दिला. 24 तास काम करणारे आमचे सरकार आहे. मी 5 वाजता उठतो, मुख्यमंत्री 4 पर्यत काम करतात. आता तुमच्या सर्वांच्या मागण्या मान्य करतो, पण निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारच्या मागे उभे रहा. नाव सांगत नाही कारण, लगेच म्हणतील जागा वाटप सुरू केले. म्हणून नाव सांगत नाही, पण तुमच्या मनासारखे होईल.’ असं ही अजित पवार यांनी म्हटले आहे.