पवारांनी स्वतःच्या मुलीसाठी नातवाला मावळात ढकललं : चंद्रकांत पाटील

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील सभेला गर्दी कमी होती या चर्चेवर आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. उन्हातही खूप चांगल्या संख्‍येने लोक आली होती. पंतप्रधानांची सुरक्षा असते त्यामुळे लोकांना आतमध्ये येण्यास वेळ लागतो आणि नंतर सगळं मैदान भरलं. पंतप्रधानांची तीन हेलिकॉप्टर असतात हे राष्ट्रवादीला माहित नाही, ते तीन हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था ती …

पवारांनी स्वतःच्या मुलीसाठी नातवाला मावळात ढकललं : चंद्रकांत पाटील

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील सभेला गर्दी कमी होती या चर्चेवर आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. उन्हातही खूप चांगल्या संख्‍येने लोक आली होती. पंतप्रधानांची सुरक्षा असते त्यामुळे लोकांना आतमध्ये येण्यास वेळ लागतो आणि नंतर सगळं मैदान भरलं. पंतप्रधानांची तीन हेलिकॉप्टर असतात हे राष्ट्रवादीला माहित नाही, ते तीन हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था ती स्टेजच्या जवळ झाली, त्यामुळे येणाऱ्या लोकांना तीन ते साडेतीन किलोमीटर फिरून यावं लागलं, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी वर्ध्यातील सभेला गर्दी नव्हती हा आरोप खोडला. शिवाय विविध मुद्द्यांवर त्यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी मेळाव्यात चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पंतप्रधानांच्या सभेला कमी गर्दी होती या केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. शिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

“पोरीला खासदार करण्यासाठी पवारांनी नातवाला मावळ मध्ये ढकललं”

भाजीच्या पिशव्या पोहोचवणारे भाजपमध्ये नेते होतात, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली. यावर पाटील यांना विचारले असता.. हेच आमचे वैशिष्ट असून माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये मी पहाटे दूध पोहोचवायचो आणि नंतर कॉलेजला जायचो. असाच माणूस नंतर मंत्री होतो असं म्हणत त्यांनी नारायण राणे यांचं उदाहरण दिलं. पवारांना जर नातवाला खासदारच बनवायचं होतं तर बारामतीला उभा करायचं होतं. त्याला तिकडे ढकलून दिलंय असं म्हणत त्यानी पवारांचं नातवापेक्षा आपल्या पोरीवर जास्त प्रेम असल्याचं स्पष्टीकरण देत अशी आमची निती नाही, असंही म्हणाले. शिवाय पवारांनी कमी बोलावं असा सल्लाही दिला.

“राजू शेट्टींना बोलणं का झोंबलं”

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे सेटिंग करणारे नेते आहेत अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर राजू शेट्टींनी सेटिंगचे आरोप सिद्ध करुन दाखवावेत असं आव्हान दिलंय. याबद्दल बोलताना चंद्रकांतदादांनी आपलं बोलणं शेट्टींना का झोंबलं असा सवाल उपस्थित करत काहीतरी काळंबेरं आहे म्हणूनच त्यांना वाईट वाटलं.. पण वेळ आल्यावर आपण हे सिद्ध करुन दाखवू असाही इशारा त्यांनी दिलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *