बोलतो ते करतोच, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणार, गडकरींचं आश्वासन

लातूर : कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठं आश्वासन दिलंय. मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करण्याचा विडा  नितीन गडकरींनी उचलला आहे. भाजपाला मतदान केल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करण्याचं आश्वासन नितीन गडकरींनी लातूरच्या प्रचारसभेत बोलताना मतदारांना दिलं. लातूरमध्ये आज भाजपाची प्रचार सभा होती. या सभेत बोलताना नितीन गडकरींनी नदी जोड प्रकल्प योजनेवर जास्त भर दिला. भाजपला […]

बोलतो ते करतोच, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणार, गडकरींचं आश्वासन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

लातूर : कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठं आश्वासन दिलंय. मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करण्याचा विडा  नितीन गडकरींनी उचलला आहे. भाजपाला मतदान केल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करण्याचं आश्वासन नितीन गडकरींनी लातूरच्या प्रचारसभेत बोलताना मतदारांना दिलं.

लातूरमध्ये आज भाजपाची प्रचार सभा होती. या सभेत बोलताना नितीन गडकरींनी नदी जोड प्रकल्प योजनेवर जास्त भर दिला. भाजपला मतदान केल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू असं आश्वासनच त्यांनी दिलं. आपण जे बोलतो ते करतोच, हे सांगायला ते यावेळी विसरले नाहीत. राज्याच्या बाहेरच्या नद्यांचं पाणी देखील मराठवाड्यात आणण्याचं आश्वासन गडकरींनी दिलं.

भारतासह परदेशातही हजारो कोटींचे रस्ते बांधणाऱ्या गडकरींच्या आश्वासनामुळे किमान आमचा दुष्काळ दूर झाला तरी बरं, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. लातूर, बीड, उस्मानाबादसह मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत, तर पिण्याच्या पाण्याची भिस्त टँकरवर आहे.

काय आहे कॅलिफोर्निया मॉडेल?

कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पश्चिमेचं राज्य आहे. या राज्याची आर्थिक आणि सामाजिक स्थिती अत्यंत मजबूत मानली जाते. पाण्याच्या नियोजनाबाबत हे शहर रोल मॉडेल आहे. काटेकोर नियोजनातून शेती आणि शहरी वापरासाठी पाणी पुरवलं जातं. अमेरिकन सरकारने 1930 मध्ये सेंट्रल व्हॅली प्रकल्प सुरु केला होता. हा प्रकल्प कॅलिफोर्नियातील शेतीच्या अर्थव्यवस्थेसाठी वरदान मानला जातो. याशिवाय 1960 आणि 1970 मध्ये कॅलिफोर्नियाचा स्टेट वॉटर प्रोजेक्ट पूर्ण झाला, ज्यामुळे अडीच कोटी लोकसंख्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. हा कॅलिफोर्निया राज्यातील सर्वात दूरदर्शी प्रकल्पांपैकी एक मानला जातो, ज्याअंतर्गत विविध बंधारे, आरक्षित पाणी, पॉवर प्लांट्स, पम्पिंग स्टेशन्स यांचा समावेश होतो, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.