दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडणार?, राजेश टोपेंनी केलं मोठं विधान

पण थोडा हलगर्जीपणा केल्यास महागात पडू शकते, असे राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडणार?, राजेश टोपेंनी केलं मोठं विधान

जालना : राज्यातील मंदिरे दिवाळीनंतर उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योग्य निर्णय घेतील, असे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात केले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. असेही लोक दसरा आणि दिवाळीला बाहेर पडतात, कोरोना व्हायरस संसर्गापासून वाचण्यासाठी सरकारने सांगितलेली पथ्यं पाळणे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पण थोडा हलगर्जीपणा केल्यास महागात पडू शकते, असे राजेश टोपेंनी सांगितलं आहे. (Will religious places open after Diwali)

अलीकडच्या काळात कोरोनाचे आकडे 8 ते 10 हजारांच्या दरम्यान दिसत आहेत. पूर्वी 20 ते 25 हजारांच्या दरम्यान असायचे. कंट्रोलमध्ये आहे ही नक्की समाधानाची बाब वाटते, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. परंतु निष्काळजीपणा केला आणि फार जास्त पद्धतीने बेदरकारपणे आपण वागलो, तर मला वाटत नाही अशी परिस्थिती राहील, असेही टोपेंनी अधोरेखित केलं आहे.

मला नम्रतेने सगळ्यांना आवाहन करायचं आहे की, कुठल्याही परिस्थितीत मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये, सोशल डिस्टन्स पाळणे याला महत्त्व दिले पाहिजे आणि काळजीचा विषय आपण नेहमीच केला पाहिजे. या माध्यमातून आपण काम केलं तर अनलॉक पद्धतीने सगळे व्यवहार चालू राहतील. सगळं काही एका शिस्तीने चालू राहिल्यास परिस्थिती बिघडेल, असं मला वाटत नाही. जर आपण बेशिस्त राहिलो तर कशाचीही खात्री देता येणार नाही, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनाचा मृत्युदर 2.62च्या दरम्यान आहे, तो कमी झालाच पाहिजे, कारण तो आपल्याला 1च्या आत आणायचा, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. रेमडिसिव्हिर इंजेक्शन कोरोना व्हायरस संसर्ग झाल्यावर तीन ते सात दिवसांत दिले तर त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत, असे आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर आपले मत देताना रेमडिसिव्हीरचा उपयोग नाही, असे म्हटलेले आहे. पण आपल्या टाक्सफोर्सने वेगळे मत नोंदवले असल्याचे टोपेंनी सांगितले.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

Special Report | बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरची कमाल, योग्य नियोजनानं मुंबईतील कोरोना नियंत्रणात

अडीच महिन्यांनंतर कोरोनासंदर्भात Good News, रुग्ण वाढण्याची साखळी मोडली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *