राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शर्ट पकडून महिलेने विचारला जाब

त्या महिलेच्या मुलावरती दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा तिचा दावा आहे.

  • नाविद पठाण, टीव्ही 9 मराठी, इंदापूर
  • Published On - 19:41 PM, 11 Jan 2021

पुणेः राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंना (Dattatraya Bharne) रस्त्यात शर्ट पकडून एक महिलेनं जाब विचारल्यानं एकच खळबळ उडालीय. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर एका महिलेनं उपोषण सुरू केले होते. उपोषणास्थळी दत्तात्रय भरणे गेले असता हा प्रकार घडलाय. त्या महिलेच्या मुलावरती दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा तिचा दावा आहे. (Woman Grabbed The Shirt Of Minister Of State Dattatraya Bharne And Asked Answer)

इंदापूरच्या पोलीस निरीक्षकाने गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्या कुटुंबाकडे लाच मागितली होती, पोलीस निरीक्षकावर कारवाई व्हावी, यासाठी भरणे यांच्या निवासस्थानासमोर उपोषण सुरू होते. सध्या त्या महिलेनं उपोषण स्थगित केलेय. त्यानंतर या सर्व प्रकरणावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ”त्यांनी माझ्या फक्त शर्टाला हात लावून त्या माझ्याशी बोलल्यात. माझा आणि त्यांचा कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत, शिवीगाळ झाल्याचा गैरसमज त्यांच्याकडून झाला होता. त्यांच्या मुलावरती खोटा गुन्हा दाखल केल्याचा गावातूनही मला सांगितलं जात आहे, जर हा खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर प्रफुल्लच्या केसाला देखील कोणाला हात लावू देणार नाही”, अशी माहितीही दत्तात्रय भरणेंनी दिलीय.

पोलीस निरीक्षकावर कारवाईसाठी इंदापूर होते बंद

इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी 9 जानेवारीला बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर शहर बंद पुकारण्यात आलेला होता. त्यास शहरातील व्यापाऱ्यांनी तसंच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्यानं इंदापूर शहर 100 टक्के बंद झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर सर्व व्यवहार दिवसभर पूर्णतः बंद होते.

पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. निरपराधी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात, असा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांनी केला होता. यासाठी त्यानी 19 डिसेंबर रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी राज्यमंत्री भरणे यांनी मध्यस्ती करत तसंच आश्वासन देत त्या आंदोलनास स्थागिती दिली होती.

संबंधित बातम्या

पोलिस निरीक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी इंदापूर शहरात कडकडीत बंद, पाहा काय आहे प्रकरण

Woman Grabbed The Shirt Of Minister Of State Dattatraya Bharne And Asked Answer