सांगलीत महिलांकडून पुरुषांना काठीने चोप, गोसावी समाजाची अनोखी होळी

नेहमी पुरुष मंडळी महिलांना मारतात असं चित्र आपण पाहिले आहे. पण मिरजमध्ये स्त्रिया होळीच्या सणावेळी पुरुषांना काठीने बदडून (Gosavi community holi) काढतात.

सांगलीत महिलांकडून पुरुषांना काठीने चोप, गोसावी समाजाची अनोखी होळी

सांगली : नेहमी पुरुष मंडळी महिलांना मारतात असं चित्र आपण पाहिले आहे. पण मिरजमध्ये स्त्रिया होळीच्या सणावेळी पुरुषांना काठीने बदडून (Gosavi community holi) काढतात. होळीच्या निमिताने गोसावी समाजात झेंड्याचा खेळ खेळला जातो. या खेळा दरम्यान महिला पुरुषांना काठीने मारतात. अनेक वर्षांपासून ही अनोखी परंपरा गोसावी समाजात चालू (Gosavi community holi) आहे.

या समाजात होळीनंतर तिसऱ्या दिवशी झेंड्याचा खेळ-खेळला जातो. ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याच ठिकाणी गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो आणि तो झेंडा पकडून सर्व महिला उभ्या असतात. तर पुरुषांकडून तो झेंडा पळवण्याचा प्रयत्न केला जातो. तर महिला, पुरूषांना झेंडा पळवून नेण्यापासून रोखतात. यावेळी पुरुष मंडळीना पिटाळून लावण्यासाठी महिला पुरुषांना काठीने बदडून काढतात.

या खेळादरम्यान अनेक पुरुषांनी झेंडा पळवण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलांनी पुरुषांना काठीने चोप दिला. पण या खेळामध्ये यावर्षी पुरुषांनी महिलांच्या हातातील झेंडा पळवत हा खेळ जिंकला.

महाराष्ट्रातील गोसावी समाज मोलमजुरी करुन आपली उपजीविका चालवतो. हा समाज धार्मिक स्वरुपाचा असल्यामुळे हिंदू सण समारंभ लोक मोठ्या श्रद्धेने साजरे करतात. होळीच्या दिवशी पुरुष मंडळीना काठीने मारण्याची परंपरा गोसावी समाजात वर्षानुवर्षे चालत आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *