अंगावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू

बुलडाणा येथे अंगावर विज पडून एका मिहलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ या गावात घडली.

अंगावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू

बुलडाणा : बुलडाणा येथे अंगावर वीज पडून एका मिहलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ या गावात घडली. या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत महिला ही भेंडवळ गावातील सरपंच भगवान जाधव यांची पत्नी आहे. कुसुमबाई जाधव असं या मृत महिलेचं नाव आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावातील सरपंच भगवान जाधव यांच्या शेतात एकूण 4 महिला आणि 2 पुरुष पेरणीचे काम करत होते. त्यावेळी अचानक पाऊस सुरु झाला असता सर्वजण झाडाखाली आडोसा घेण्याकरीता गेले. मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाल्याने झाडावर वीज पडली आणि यामध्ये कुसुमबाई जाधव ह्या भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पडताच गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली आणि सर्वाना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी तहसीलदार सहप्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुध्दा घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *