रुग्णवाहिका पोहचण्यास उशीर, गर्भवतीची रस्त्यावरच प्रसुती

रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाली (Women delivery on road) आहे. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे घडली आहे.

Women delivery on road, रुग्णवाहिका पोहचण्यास उशीर, गर्भवतीची रस्त्यावरच प्रसुती

जळगाव : रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाली (Women delivery on road) आहे. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे घडली आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती (Women delivery on road) स्थिर आहे.

महिलेचा परिवार पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करतात. हे कुटुंब एका गावावरुन दुसऱ्या गावी मेंढ्या घेवून फिरत असतात. मुक्ताईनगर येथे हे मेंढपाळ आल्यानंतर महिलेला प्रचंड प्रसुती कळा सुरु झाल्या. स्थानिकांच्या मदतीने 108 या रुग्ण वाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने या महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

प्रसुतीनंतर अक्षरशः ब्लेडद्वारे नाळ कापण्यात आली. जर यावेळी या महिलेला आणि तिच्या बाळाचा जीव गेला असता तर त्यास जबाबदार कोण असते ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या घटनेने आरोग्य विभागाचे ढासळलेले नियोजन यावरही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

या मेंढपाळ कुटुंबातील महिलेला प्रसुती वेदना होत असल्याची माहिती शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाट यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनस्थळी धाव घेत महिलेस स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

विशेष म्हणजे कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे माहाविकास आघाडीच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यास मुक्ताईनगरमध्ये होते. त्याच रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे.

शेतकऱ्यांसाठी आम्ही तत्पर असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात आश्र्वासन दिले होते. मात्र या ठिकाणची ढासळलेली आरोग्य यंत्रणा पाहता याकडे मुख्यमंत्री लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *