वाशीत लॉजमध्ये रक्ताचा पाट, अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह, गूढ वाढलं!

नवी मुंबई : वाशी जुहूगाव येथील संकल्प लॉजमध्ये एका महिलेची गळा चिरुन हत्या झाली. लॉजमध्ये महिलेचा गळा चिरल्याने संपूर्ण रुमभर रक्त पसरलं होतं. तसेच, महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. ही घटना रविवरी संध्याकाळी संकल्प लॉजमध्ये घडली. मंदा सुखडारे (वय 40 वर्षे) असे महिलेचं नाव आहे, तर अशोक दळवी (वय 45 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी …

वाशीत लॉजमध्ये रक्ताचा पाट, अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह, गूढ वाढलं!

नवी मुंबई : वाशी जुहूगाव येथील संकल्प लॉजमध्ये एका महिलेची गळा चिरुन हत्या झाली. लॉजमध्ये महिलेचा गळा चिरल्याने संपूर्ण रुमभर रक्त पसरलं होतं. तसेच, महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. ही घटना रविवरी संध्याकाळी संकल्प लॉजमध्ये घडली. मंदा सुखडारे (वय 40 वर्षे) असे महिलेचं नाव आहे, तर अशोक दळवी (वय 45 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सध्या फरार आहे. हत्या का झाली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. वाशी पोलिस या हत्येचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेमकी घटना काय घडली?

वाशी येथील लॉजमध्ये काल संध्याकाळी महिला आणि तिच्यासोबत आलेली व्यक्ती हे दोघेही 4 वाजून 20 मिनिटांनी लॉजमध्ये दाखल झाले होते. तिसऱ्या मजल्यावरील 306 क्रमांकाची खोली त्यांनी घेतली. मात्र काही वेळाने महिलेबरोबर आलेली व्यक्ती घाई-घाईने निघून गेली. यामुळे लॉज चालकांना त्याचा संशय आला. म्हणून त्याची तपासणी करण्यासाठी रूम मध्ये गेले असता, ती महिला अर्धनग्न मृत अवस्थेत बेडवर पडली होती आणि पूर्ण रक्त रुममध्ये पसरले होते.

यावेळी लॉज चालकांनी त्वरीत वाशी पोलिसांशी संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली. महिलेसोबत आलेल्या व्यक्तीचे नाव अशोक दळवी (45) आहे. तर मृत महिलेचे नाव मंदा सुखडारे (40) उर्फ उमा असे आहे. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वाशी पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.

मृत महिला मुंबईमधील विलेपार्ले पश्चिमेकडील नेहरूनगर येथील रहिवासी आहे. सदर महिला आणि फरार आरोपी या लॉजमध्ये  येत होते. अशी लॉजमधील रजिस्टरमध्ये नोंद आहे, असं वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *