10 रुपयात साड्यांचा महासेल, चेंगराचेंगरीच्या स्थितीमुळे सेल बंद!

साड्यांचा सेल हा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय....पण जर एखाद्या साड्यांच्या सेलमध्ये तुम्हाला केवळ 10 रुपयांत एक साडी मिळत असेल तर...धक्का बसला ना? पण हे खर आहे.

10 रुपयात साड्यांचा महासेल, चेंगराचेंगरीच्या स्थितीमुळे सेल बंद!

उल्हासनगर : भारतीय वेशभूषेत महिला साड्यांना विशेष महत्व देतात. साड्यांचा सेल हा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय….पण जर एखाद्या साड्यांच्या सेलमध्ये तुम्हाला केवळ 10 रुपयांत एक साडी मिळत असेल तर…धक्का बसला ना? पण हे खर आहे. उल्हासनगरच्या एका दुकानात साड्यांचा सेल लागला आहे. या सेलमध्ये खरेदी केलेली कोणतीही साडी तुम्हाला अवघ्या 10 रुपयांना मिळत आहे.

उल्हासनगरमधील रंग क्रिएशन दुकानात 5 जूनपासून हा महासेल सुरु करण्यात आला आहे. या सेलमध्ये केवळ 10 रुपयांना ग्राहकांना साडी मिळत आहे. या सेलची माहिती मिळताच मुंबई, ठाणे, उल्हासनगर याठिकाणच्या महिलांनी साडी खरेदी करण्यास एकच गर्दी केली.

महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लावलेल्या या सेलला सुरुवात झाल्यापासून येथे अनेक महिलांनी गर्दी केली. विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांची गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश चित्र निर्माण झालं होतं. त्यामुळे काही काळ या ठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान तीन दिवसांनंतर आज 8 जून अखेर दुकान मालकांनी हा सेल बंद केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारणाने दुकान मालकांनी दुकान बंद करण्याच निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा सेल बंद झाल्यानंतर या ठिकाणी महिलांची गर्दी जमल्याचं दिसत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *