100 फूट खोल विहिरीत उडी मारुनही महिला सुखरुप

"देव तारी त्याला कोण मारी" याचा प्रत्यय साताऱ्यातील फलटण तालुक्यात आला आहे. घरगुती भांडणातून झालेल्या वादामुळे एका मिहिलेने थेट 100 फूट खोल विहिरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

100 फूट खोल विहिरीत उडी मारुनही महिला सुखरुप

सातारा : “देव तारी त्याला कोण मारी” याचा प्रत्यय साताऱ्यातील फलटण तालुक्यात आला आहे. घरगुती भांडणातून झालेल्या वादामुळे एका मिहिलेने थेट 100 फूट खोल विहिरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने ती वाचली आहे. विहिरीत जीव देण्यासाठी गेलेली महिला विहिरीच्या अडगळीत अडकली. महिलेने आरडा ओरडा केल्यावर विहिरीतून तिला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

नेमकं प्रकरण काय

फलटण तालुक्यातील एका गावात घरगुती वादातून झालेल्या भांडणात महिलेने गावाजवळच्या 100 फूट खोल विहिरीत उडी मारली. मात्र  “देवतारी त्याला कोन मारी” याचा प्रत्यय या ठिकाणी घडला. आत्महत्या करण्यासाठी आलेली महिला विहिरीत एका अडगळीत अडकल्याने ती बचावली आणि यादरम्यान महिलेचा थोड्या वेळातच विचार बदलला. तिने जीव वाचवण्यासाठी महिलेने धडपड सुरु केली. पाच तासाहून अधिक वेळ ही महिला विहिरीतील अडगळीतील कपारीला धरुन होती.

यावेळी विहिरी शेजारी गावातील अक्षय मोहिते हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांना शेतालगत कोणीतरी अनोळखी व्यक्‍ती शोधाशोध करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांची विचारपुस केली असता संबंधित व्यक्‍तीने  घरगुती वादातून एक विवाहिता घरातून रागात निघून गेल्याने तिचा शोध सुरु असल्याचे सांगितले. महिला त्या ठिकाणी नसल्याने संबंधित व्यक्‍ती त्या ठिकाणाहुन निघून गेली.

अक्षय मोहिते गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विहिरीची पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विहिरीतून महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. अक्षय यांनी विहिरीवरुन वाकून पाहिले असता एक महिला विहरीच्या कठड्यांना धरुन मदतीसाठी आकांत करत असल्याचे त्यांना दिसले. विहिर अडगळीची होती. त्याला पायर्‍याही नव्हत्या. मोहिते यांनी पोलिस पाटील दयानंद चव्हाण यांना फोन करुन माहिती दिली. विवाहितेला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शिताफिचे प्रयत्न सुरु झाले.

यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्या विवाहितेला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर ती बेशुध्द पडली. तात्काळ त्या विवाहितेला उपचारासाठी फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी घरगुती वादाला कंटाळून हे कृत्य केल्याचे या महिलेने सांगितले.

सध्या या प्रकरणाचा फलटण पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र 100 फूट अडगळीच्या या विहिरीत लाकूड, लोखंडी पाईप असुन देखील एखादा वरुन पडल्यानंतर त्यातून जगू शकणार नाही अशीच परिस्थिती त्याठिकाणी आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *