मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, धनगर आरक्षणासाठी मेंढीची पूजा

महेंद्र मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड: मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानेही उचल घेतली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक होत आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी मिळावी आणि धनगर समाजाला आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने  मेंढीची आरती करुन, आरक्षणाची मागणी करण्यात आली.  येळकोट येळकोटच्या जयघोषात धनगर समाजातील महिला आणि …

, मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, धनगर आरक्षणासाठी मेंढीची पूजा

महेंद्र मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड: मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानेही उचल घेतली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक होत आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी मिळावी आणि धनगर समाजाला आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने  मेंढीची आरती करुन, आरक्षणाची मागणी करण्यात आली.  येळकोट येळकोटच्या जयघोषात धनगर समाजातील महिला आणि पुरुषांनी मेंढीची आरती करत हे आंदोलन केले.  मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालाही आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी धनगर समाजाच्या नेत्यांनी केली.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडवू असं आश्वासन सत्तेवर येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र फडणवीस सत्तेवर येऊन चार वर्षे उलटूनही धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

धनगर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी टीस संस्थेला काम दिले होते. आरक्षणाचा सर्व अभ्यास करुन चार वर्षांनंतर हा अहवाल टीस संस्थेने सरकारकडे सुपूर्द केला. त्यानंतर हा अहवाल केंद्राकडे पाठवणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं होतं. मात्र हे सरकार चालढकल करत असल्याचा आरोप धनगर समाजातील जनतेने केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *