यवतमाळ जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल, पर्यावरण संतुलनासाठी निसर्गप्रेमी सरसावले

यवतमाळ जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. झाडाच्या संवर्धनासाठी आणि संतुलनासाठी जिल्ह्यातील निसर्गप्रेमी सरसावले आहेत.

  • विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ
  • Published On - 12:49 PM, 15 Nov 2020
यवतमाळ जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल, पर्यावरण संतुलनासाठी निसर्गप्रेमी सरसावले

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. झाडांच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी जिल्ह्यातील निसर्गप्रेमी सरसावले आहेत. वृक्ष संवर्धनासाठी पुढे सरसावत ‘प्रयास वन’ नावाची चळवळ पर्यावरणप्रेमींनी सुरु केली आहे. (Yavamaal Nature Lover prayas movement Strive Tree Conservation)

यवतमाळ जिल्हा हा आपल्या हजारो हेक्टर वृक्ष संपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही दिवसात जिल्ह्यात चारही बाजूने रस्ता रुंदीकरण मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यामुळे हजारो परिपक्व झाडांची कत्तल करण्यात येत आहे. एकीकडे विकासही महत्वाचा तर दुसरीकडे पर्यावरण संतुलनदेखील महत्वाचे आहे. म्हणूनच निसर्गप्रेमींनी पुढे सरसावत वृक्ष संवर्धनासाठी ‘प्रयास वन’ नावाची चळवळ सुरु केली आहे. यवतमाळ येथे वनविभागाच्या दहा हेक्‍टर जमिनीवर ‘प्रयासवन’ची निर्मिती केली आहे . हे काम फक्त लोकसहभागातून होत आहे हे विशेष म्हणावं लागेल.

पुढील सात वर्षात दहा हजार वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट असून त्यापैकी 2000 वृक्षारोपणाचे काम आज पर्यंत झाले आहे. प्रयास वन येथे सध्या वॉकिंग ट्रॅकचे काम काही अंशी पूर्ण झाले असून भविष्यात, योगाकरिता व्यवस्था, नक्षत्रवन, फुलपाखरुउद्यान, यासह ओपन एअर थिएटर आणि निसर्ग वाचन केंद्र असणार आहे. येणाऱ्या पिढीकरिता निसर्ग संवर्धन व्हावे म्हणूनयवतमाळच्या प्रयास संस्थेने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(Yavamaal Nature Lover prayas movement Strive Tree Conservation)

संबंधित बातम्या

संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर 29 प्रकारच्या 2373 झाडांची कत्तल, हरित न्यायाधिकरणाकडून गंभीर दखल

नागपुरात चार वर्षात 4 लाख वृक्षांची कत्तल, माहिती अधिकारात उघड