LIVE यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात तिहेरी लढत होईल असे चित्र आहे. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यातच मुख्य लढत होईल. तिसरे उमेदवार भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी. बी. आडे हेही या स्पर्धेत असले, तरी ते एका विशिष्ट समाजाच्या पलिकडे पोहोचू शकले नाहीत, असं जाणकारांचं मत आहे. आडे यांना युतीतीलच …

LIVE यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात तिहेरी लढत होईल असे चित्र आहे. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यातच मुख्य लढत होईल. तिसरे उमेदवार भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी. बी. आडे हेही या स्पर्धेत असले, तरी ते एका विशिष्ट समाजाच्या पलिकडे पोहोचू शकले नाहीत, असं जाणकारांचं मत आहे. आडे यांना युतीतीलच काही नेत्यांनी उमेदवार म्हणून उभे केले असले, तरी आता या नेत्यांनी पक्षाच्या दबावामुळे आडेंवरील आपले छत्र काढल्याची चर्चा आहे. पी. बी. आडे, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वैशाली येडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार, बसपचे अरूण किनवटकर हे उमेदवार मतांचे विभाजन करतील. मात्र, या मतदारसंघात आघाडी आणि युतीतच मुख्य लढत होईल असे संकेत मिळत आहे.

LIVE UPDATE

  • यवतमाळ – भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी आडे यांनी कुटुंबासह आज सकाळी सात वाजता वाय पी एस शाळेत मतदानाचा हक्क बजावला. पी.बी. आडे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्या विजयाचे समीकरण बदलविण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
  • यवतमाळ शहरातील महात्मा फुले नगरपरिषद माध्यमिक विद्यालय यवतमाळ इथे EVM मध्ये तांत्रिक बिघाड, EVM तासभर बंद पडले होते, नागरिकांची मतदानाला मोठी गर्दी

माणिकराव ठाकरेंच्या प्रचाराला मोठ्या नेत्यांची गैरहजेरी

शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी वगळता इतर कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक आले नाहीत. त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. भावना गवळी यांच्यासाठी आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या असून याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. मात्र, काँग्रेस नेते आणि आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यासाठी एकाही बड्या नेत्याची सभा याठिकाणी झाली नाही.

यावेळी बंजारा समाजाची मते निर्णायक ठरणार का?

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात बंजारा समाजाची मते निर्णायक ठरतात. यावेळी मात्र, पी. बी. आडेच नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार आणि अन्य 3-4 अपक्ष बंजारा उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे ही मते विभागली जाऊन प्रभावी न ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच ही मते यावेळीही निर्णायक ठरतील की नाही हे येणारा निकालच ठरवेल. मागासवर्गीय आणि मुस्लिम मते यावेळी काँग्रेस सोडून इतरत्र जाण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. प्रविण पवार यांना मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांचा फायदा होईल, असे सध्या तरी चित्र नाही.

माणिकराव ठाकरे आणि भावना गवळी यांच्यासाठी कुणबी मतांचे विभाजन अटळ आहे. मात्र, मतदारसंघातील तिरळे कुणबी कोणाच्या पारड्यात मते टाकतात आणि कुणबींशिवाय इतर तेली, माळी, धनगर हे बहुजन कुणाला झुकते माप देतात यावरही निवडणुकीची पुढील बरीच गणिते अवलंबून आहेत. यानुसारच निकाल पाहायला मिळेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *