कोंबड्यांच्या लढाईवरील जुगारांवर यवतमाळ पोलिसांची कारवाई, तिघांना बेड्या, 15 जणांविरुद्ध गुन्हा

यवतमाळ तालुक्यातील वाई (हातोला) येथे सुरु असलेल्या कोंबड्यांच्या लढाईवरील जुगारांवर छापा टाकून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

कोंबड्यांच्या लढाईवरील जुगारांवर यवतमाळ पोलिसांची कारवाई, तिघांना बेड्या, 15 जणांविरुद्ध गुन्हा
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 3:30 PM

यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील वाई (हातोला) येथे सुरु असलेल्या कोंबड्यांच्या लढाईवरील जुगारांवर छापा टाकून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई वनविभागाच्या नर्सरीजवळ करण्यात आली. पोलिसांना बघून काही जुगाऱ्यांनी धूम ठोकली. त्यातील दहा जणांची नावे रेकॉर्डवर घेण्यात आली असून एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. (Yavatmal Police Action Against kombad bajar 3 Accussed Arrested)

शाम येटरे (वय 26, रा. सावर), हरिचंद राठोड (वय 60), सदानंद बेले (वय 30, रा. पिपरी) यांना ताब्यात घेण्यात आले. पळून जाणारे सागर कोरे (वय 32), गजानन ढेगारे (रा. सावर), गोलू किन्नाके, प्रकाश राठोड, संजय राठोड, अरुण राठोड, विजय राठोड यांनाही रेकॉर्डवर घेण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी अवैध व्यवसाय पूर्णता: बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, वाई (हातोला) येथील कोंबडबाजार पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरुच होता. अखेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी कारवाईसाठी सापळा रचून छापा टाकला.

यावेळी पळून जात असताना पोलिसांनी तिघांना पकडले. घटनास्थळावरून सात दुचाकीसह दोन लाख 45 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणेश बुर्रेवार यांच्या तक्रारीवरून पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

कसा असतो कोंबड बाजारातील जुगार?

लढाईचे कोंबडे हे विशिष्ट पद्धतीने तयार केलेलं असतात. त्यांना वर्षभर विशेष खाद्य पद्धतीचे दिले जाते आणि लढाईचं ट्रेनिंग दिलं जाते.  कोंबड बाजारातील हा जुगार घनदाट जंगलात भरतो. या लढाईच्या कोंबड्याच्या पायाला काती (धारधार चाकू) बांधला जातो. तो चाकू फक्त कातकरी असलेला व्यक्ती बांधून देतो. इतर कोणीही सहज त्याच्या पायाला काती बांधू शकत नाही. त्यानंतर सुरु होते दोन कोंबड्यांमध्ये झुंज….

दोन्ही पार्टीचे लोक आपआपल्या कोंबड्यावर सट्टा लावतात. जो कोंबडा जिंकतो त्या मालकाला पैसे आणि मारला गेलेला कोंबडा दोन्ही गोष्टी मिळतात.  साधारण एका कोंबड्याच्या लढाईत मालकाला 50 हजार रुपयेपर्यंत जुगाराची रक्कम मिळते आणि जो जुगार भरवतो त्याला 10 टक्के कमिशन मिळते.  ह्या जुगाराचे दर्दी यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाहावयास मिळतात.

(Yavatmal Police Action Against kombad bajar 3 Accussed Arrested)

संबंधित बातम्या

यवतमाळमध्ये कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरु; विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्रक बंधनकारक

यवतमाळ जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल, पर्यावरण संतुलनासाठी निसर्गप्रेमी सरसावले

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.