Yavatmal Crime : यवतमाळमध्ये घरगुती वादातून सुनेने सासूवर गोळ्या झाडल्या; गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये घरगुती वादातून सुनेने सासूवर गोळ्या झाडल्या; गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
जगावेगळ्या मैत्रीचा करूण अंत

नेहमीप्रमाणे अरविंद एका हमालासह घराबाहेर भाजी विकायला जायची तयारी करीत होता. तर आशाबाई आणि सून सरोज घरामध्ये होत्या. गोळीचा आवाज ऐकून मुलगा आणि शेजारी घरात धावत आले असता आशाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.

विवेक गावंडे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 24, 2022 | 10:58 PM

यवतमाळ : घरगुती वादातून सुनेने (Daughter in law) सासूची (Mother in law) गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना यवतमाळमधील आर्णी शहरातील शिवाजी नगरमध्ये घडली आहे. गोळीबारात गंभीर झालेल्या महिलेला तात्काळ उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुनेला आर्णी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. आशाबाई किसनराव पोरजवार(60)(Ashabai Kisanrao Poarajvar) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आशाबाई या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. मयत आशाताई यांना दोन मुलं आणि दोन विवाहित मुली आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेलकर दाखल झाले. ठाणेदार पितांबर जाधव, पीएसआय किशोर खंडार, एलसीबी पथक, फिंगर प्रिंट तपासणारे पथक व पोलीस यंत्रणा घटनास्थळी पुढील तपास करीत आहे. (In a domestic dispute, daughter in law shot and killed his mother in law in yavatmal)

घरगुती वादातून सुनेने उचलले टोकाचे पाऊल

मयत आशाबाई पोरजवार या आपल्या कुटुंबासह आर्णी शहरातील प्रभाग दोन शिवाजी नगरमध्ये राहतात. आशाबाई आणि मोठा मुलगा अरविंद दोघे जण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे अरविंद एका हमालासह घराबाहेर भाजी विकायला जायची तयारी करीत होता. तर आशाबाई आणि सून सरोज घरामध्ये होत्या. गोळीचा आवाज ऐकून मुलगा आणि शेजारी घरात धावत आले असता आशाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या तोंडातून आणि कानातून रक्त येत होते. रक्तबंबाळ अवस्थेत आशाबाईंना यवतमाळमध्ये रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सुनेला ताब्यात घेतले. रोजच्या वादातून सुनेने सासूची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

नांदेडमध्ये किरकोळ वादातून मित्रांनीच केली मित्राची हत्या

किरकोळ वादातून नांदेडमध्ये मित्रांनीच आपल्या एका मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनील सुलगेकर (21) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुनील गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता होता. पोलीस त्याचा सर्वत्र कसून शोध घेत होते. याच तपासादरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार पुढील तपास केला असता पाच मित्रांनी मिळून 18 डिसेंबर 2021 रोजी सुनीलची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. हत्या केल्यानंतर मित्रांनी सुनीलचा मृतदेह जाळून टाकला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी हाडे गोदावरी नदीत फेकून दिली. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांना दोघांनाही अटक केली आहे. तर तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (In a domestic dispute, daughter in law shot and killed his mother in law in yavatmal)

इतर बातम्या

Kalyan Crime : हौसेला मोल नाही; केवळ महागड्या वस्तूंसाठी केडीएमसी कर्मचार्‍याची पत्नी बनली चोर

Chandiwal Commission : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सचिन वाझेच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर उलटतपासणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें