Yawatmal | पुरात वाहून गेल्याने माय-लेकीचा मृत्यू, यवतमाळमधील दुर्देवी घटना

नाला पार करत असताना अचानक पाण्याच्या लोंढ्याने या दोघी मायलेकी पुरात वाहून गेल्या

Yawatmal | पुरात वाहून गेल्याने माय-लेकीचा मृत्यू, यवतमाळमधील दुर्देवी घटना

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील माय-लेकी (Yawatmal Flood Mother-Daughter Drown) पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या माय-लेकी शेतामध्ये निंदनासाठी गेल्या असता सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. घरी परतताना आरंभी-चिरकुटा मार्गावरील नाल्याला पाणी वाहत होते. हा नाला पार करत असताना अचानक पाण्याच्या लोंढ्याने या दोघी मायलेकी पुरात वाहून गेल्या (Yawatmal Flood Mother-Daughter Drown).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या पुरात कविता किशोर राठोड (वय 35) आणि मुलगी निमा किशोर राठोड (वय 15) या वाहून गेल्या आहेत. या घटनेची माहिती आरंभी या गावातील नागरिकांना मिळताच त्यांनी या दोन्ही मायलेकींचा शोध घेणे सुरु केलं. दिग्रस तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाच्या पथकानेही या माय-लेकींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत या माय-लेकींचा शोध लागला नव्हता.

आज (15 जुलै) सकाळच्या सुमारास आरंभी ते सावरगाव (खुर्द) या दोन गावाच्या मधातून जाणाऱ्या नाल्या शेजारी असलेल्या भुजाडे नामक शेतकऱ्याच्या शेताजवळ मुलीचा, तर जाधव यांच्या शेताजवळ आईचा मृतदेह आढळून आला. दिग्रसचे तहसीलदार राजेश वझिरे यांच्यासह नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणी करिता दिग्रसला पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Yawatmal Flood Mother-Daughter Drown

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *