Lock Down : यवतमाळमध्ये लॉकडाऊन दरम्यान बिअर बार फोडले, 33 हजारांची दारु घेऊन चोरटा लंपास

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशातील दारुची दुकानंही बंद आहेत.

Lock Down : यवतमाळमध्ये लॉकडाऊन दरम्यान बिअर बार फोडले, 33 हजारांची दारु घेऊन चोरटा लंपास

यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण (Lock Down) देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशातील दारुची (Yawatmal Liquor Theft) दुकानंही बंद आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी येथेही सध्या लॉकडाऊनमुळे बियरबार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे सर्व बार आणि शॉप बंद आहेत. यायाच फायदा घेऊन एका चोरट्याने रात्री झरी येथील एक बिअर बार फोडले. त्याने या बिअर (Yawatmal Liquor Theft) बारमधून तब्बल 33 हजारांच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या दारु लंपास केल्या.

वणी येथील रहिवाशी असलेले राहुल डफ यांचे झरी येथे राहुल नावाचे बियरबार आहे. काल या परिसरात वादळी वारा होता. त्यामुळे तिथे चौकीदार नव्हता. याचाच फायदा येऊन अज्ञात चोरट्याने बारला लावलेले शेटरचे लॉक तोडले. आत प्रवेश केला आणि बारमधला जवळपास सर्वच माल उचलून नेला. यात विविध कंपनीच्या दारु होत्या. ज्यांची किंमत 33 हजार रुपये इतकी होती.

मंगळवारी सकाळी बार फोडल्याचे उघडकीस येताच स्थानिक रहिवाशी ज्ञानेश्वर अरके यांनी बार मालक राहुल डफ यांना याबाबत माहिती दिली. राहुल डफ यांनी चोरीची माहिती पाटण (Yawatmal Liquor Theft) पोलीस स्टेशनला दिली. यावरुन पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास पाटण पोलीस करत आहेत.

औरंगाबादेतही तळीरामांनी बिअर बार फोडलं

औरंगाबाद शहरातील सेवन हिल परिसरातही तळीरामांनी बिअर बार फोडल्याची घटना घडली. बिअर बार फोडून दारुच्या अनेक बाटल्या या तळारामांनी लंपास केल्या. शर्ट आणि पॅन्टमध्ये बाटल्या कोंबून हे चोरटे पसार झाले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

दारु न मिळाल्याने नागपुरात एकाचा मृत्यू 

गेल्या आठ दिवसांपासून दारु न मिळाल्याने एका व्यक्तीची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला आहे. नागपुरात ही घटना घडली आहे.

Yawatmal Liquor Theft

संबंधित बातम्या :

कोरोना उपचारात व्हेंटिलेटरची कमतरता, नौदलाकडून एकाचवेळी 6 रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर विकसित

Lock Down | मंगल कार्यालयाचे अॅडव्हान्स परत द्या, प्रशासनाचे आदेश, लॉकडाऊनमुळे लग्न लांबली

लॉकडाऊनमुळे दारुची दुकान बंद, दारुअभावी नागपुरात एकाचा मृत्यू झाल्याचा दावा

चहा प्यायल्यानंतर कप फोडला, डोळ्यात पाणी येत होतं, बच्चू कडूंनी अनुभवलेले कोरोनाचे 3 दिवस

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *