वाशिममध्ये भावना गवळींना अध्यात्मिक गुरु प्रेममासाईंचं आव्हान

वाशिम : अध्यात्मिक गुरु प्रेममासाई महाराज यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी सात वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मदत केली नाही, म्हणून प्रेममासाई महाराजांनी भावना गवळी यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सात वर्षाच्या मुलीच्या उपचारासाठी प्रेममासाई महाराज यांनी फोन करुन खासदार …

loksabha elections, वाशिममध्ये भावना गवळींना अध्यात्मिक गुरु प्रेममासाईंचं आव्हान

वाशिम : अध्यात्मिक गुरु प्रेममासाई महाराज यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी सात वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मदत केली नाही, म्हणून प्रेममासाई महाराजांनी भावना गवळी यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

सात वर्षाच्या मुलीच्या उपचारासाठी प्रेममासाई महाराज यांनी फोन करुन खासदार भावना गवळी यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. मात्र, भावना गवळींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. त्यावेळी दुसऱ्या राज्यातील खासदारांनी त्या मुलीच्या उपचारासाठी मदत केली होती. त्यावेळी प्रेमासाई यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार करत विद्यमान खासदारांविरुद्ध दंड थोपटले होते.

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या मेनका गांधी आणि वरुण गांधी यांनी यवतमाळ येथील आश्रमात भेट दिल्यानंतर प्रेमासाई महाराज हे चर्चेत आले होते. प्रेमासाई महाराज हे ‘अध्यात्मातून राष्ट्रनिर्मीतीकडे’ असा नारा देत वाशिम आणि यवतमाळ जिल्हयात गेल्या एका वर्षापासून सक्रिय झाले आहेत. तसेच यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्यावतीने तिकीट मिळावे म्हणून त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, शेवटच्या क्षणी शिवसेना-भाजप युती झाल्याने त्यांचा भ्रमनिराश झाला. त्यामुळे प्रेमासाई महाराज यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेतला. प्रेमासाई महाराज हे आज यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता नामांकन भरणार आहेत आणि शक्ती प्रदर्शन घडविणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *