सेक्स करताना झाला तरुणाचा मृत्यू, नागपूरमधल्या घटनेत प्रेयसीवर गुन्हा दाखल

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

सेक्स करताना झाला तरुणाचा मृत्यू, नागपूरमधल्या घटनेत प्रेयसीवर गुन्हा दाखल

नागपूर : मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारे शाररिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, तरुणांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी नंतर आता त्या युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या प्रकरणाला नवीन वळण येताना दिसून येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. (Young man dies while having sex incident in Nagpur)

‘नया कुछ करते’च्या नादात नागपूरच्या एक युवकाने हात पाय बांधून सेक्स करण्याचं ठरवलं त्यानुसार त्यांनी कृत्य केलं. मात्र, हे जीवावर बेतलं. मृत तरुण हा इंजिनिअर असून तो सध्या बेरोजगार होता. तो आणि त्याची 20 वर्षीय तरुणीमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. दोन वर्षांपूर्वी त्याने या तरुणीशी लग्नदेखील केलं होतं.

गुरुवारी दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघांनीही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजवर एक खोली बुक केली होती. तिथे गेल्यानंतर दोघांनी शाररिक संबंध प्रस्तावित केले. यावेळी वेगवेगळ्या पोजिशनमध्ये शाररिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला.

तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले. त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याच्या भवतीसुद्धा अवळण्यात आली होती. या सगळ्यानंतर तरुण खुर्चीसह खाली कोसळला. त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला होता. ज्यामुळे त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

त्यावरून प्राथमिक तपास करत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, आता युवकांच्या वडिलांच्या तक्रारीवरून तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा संपूर्ण सखोल तपास करत असून यात आणखी काय पुढे येते याचा शोध घेत आहे. (Young man dies while having sex incident in Nagpur)

संबंधित बातम्या – 

नाशकात चाकूचा धाक दाखवून अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांच्या मुसक्या आवळल्या

Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री

(Young man dies while having sex incident in Nagpur)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI