तरुणाने बेस्ट बसची काच फोडली…व्हिडिओ व्हायरल; तरुणाला पोलिसांनी केली अटक

दरम्यान त्याच्यावर चालकास शिवीगाळ करून दगडाने बसची समोरून काच फोडून नुसकान करून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याला पोलिसांनी अकट केली आहे.

तरुणाने बेस्ट बसची काच फोडली…व्हिडिओ व्हायरल; तरुणाला पोलिसांनी केली अटक
बेस्ट बसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 9:48 PM

मुंबई : मुंबईतील हजारो लोकांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याचे काम लोकल आणि बेस्ट बस (Best Bus) करत असते. तर अनेक ठिकाण ही अशी आहेत की जेथे मुंबई लोकल (Mumbai Local) पोहचत नाही. तेथे प्रवाशांना आधार आहे तो बेस्ट बसचा. पण आता या आधारालाच तडे जात आहेत. प्रवाशीच बेस्ट बसवर उठले आहेत. मुंबईत अनेक गर्दीची ठिकाणे आहेत जेथे बेस्ट बस चालक आणि इतर प्रवाशांमध्ये वाद हा होत असतो. अशीच एक घटना गुरूवारी सकाळी मालाड परिसरात घडल्याचे समोर आले आहे. तर प्रवाशाने गाडीत का घेतलं नाही म्हणत दगडाने बसची काच फोडली. ज्यानंतर आता सध्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल  मिडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. तर बांगूर नगर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली असून त्याचे नाव मेरवील अन्थेनो राबे असे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, चारकोप ते संतोष नगर गोरेगाव अशी जाणारी बस मालाड येथील मीठ चौकीजवळ सकाळी 9:45 वाजण्याच्या सुमारास पोहचली होती. त्यावेळी मेरवील अन्थेनो राबेरो (वय 26) बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र बस पूर्ण भरलेली असल्याने बसमध्ये त्याला घेतले नाही. यावरून त्याने गाडीच्या आडवे येत बेस्ट बस चालक शंकर भिवा मोरे (वय 47) यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच बस मध्ये का घेतलं नाही म्हणत बसगाडीची पुढील काच दगडाने फोडली. राबेरो हा मालाड मीठ चौकी परिसरात राहणारा असून त्याला वर्सोवा या ठिकाणी जायचे होते. मात्र त्याने गाडीत का घेतले नाही म्हणत गाडीची काच फोडली. यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामुळे बांगूर नगर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली.

हे सुद्धा वाचा

दरम्यान त्याच्यावर चालकास शिवीगाळ करून दगडाने बसची समोरून काच फोडून नुसकान करून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याला पोलिसांनी अकट केली आहे.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.