अल्पवयीन भावानेच केला बहिणीचा खून, टीव्ही पाहण्यावरून झाला होता वाद

आई-वडील बाहेर गेले असताना टीव्ही पाहण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून भावाने बहिणीची दुर्दैवी हत्या केली आहे.

अल्पवयीन भावानेच केला बहिणीचा खून, टीव्ही पाहण्यावरून झाला होता वाद

अहमदनगर : बहिण-भावाच्या नात्यामध्ये दुरावा आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमध्ये अल्पवयीन भावानेच आपल्या अल्पवयीन बहिणीची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. (younger brother killed sister in Ahmednagar crime news)

मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही पाहण्याच्या वादातून भावाने बहिणीची हत्या केली. यात भावाने रागाने बहिणीच्या डोक्यात हातोडी घातली. आई-वडील बाहेर गेले असताना टीव्ही पाहण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून भावाने बहिणीची दुर्दैवी हत्या केली आहे. नगरच्या केडवगाव उपनगरातील शाहूनगर इथं ही घटना घडली आहे.

9 वर्षाच्या बहिणीची 12 वर्षीय भावाने हत्या केल्याने नगर शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपी भावाने घरामधील लॅपटॉप आणि पैसे घेऊन केडगाव बायपास इथलं एक हॉटेल गाठलं. तिथे त्याने मला घरच्यांनी मारहाण केली असून तुमच्या हॉटेलमध्ये नोकरी द्या, असं हॉटेलच्या व्यवस्थापकाला सांगितलं.

यावेळी हॉटेलच्या व्यवस्थापकाने मुलाच्या पालकांना फोन केला. त्यानंतर मुलाचे पालक तातडीने घरी पोहोचले असता त्यांना त्यांची मुलगी बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सापडली. यानंतर पुढे पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पोलिसांनी बहिणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

इतर बातम्या-

महिन्याला 1 रुपयात मिळवा घसघशीत फायदा, जबरदस्त आहे सरकारची ही योजना

अडीच महिन्यांनंतर कोरोनासंदर्भात Good News, रुग्ण वाढण्याची साखळी मोडली

(younger brother killed sister in Ahmednagar crime news)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *