चंद्रपुरात तरुणाकडून प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने 18 वार

निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर : प्रेमभंगातील जीवघेणा प्रकार आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या ब्राह्मणी-तुकूम रस्त्यावर पाहायला मिळाला. एका प्रियकराने प्रेयसीवर चाकूने तब्बल 18 वार केले. प्रियकराने विषप्राशन करून स्वतःला संपविण्याचाही प्रयत्न केला. दोघानांही गंभीर अवस्थेत वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलीच्या घरच्यांनी प्रेमाला विरोध केला होता आणि त्यातूनच या मुलाने तिच्यावर सपासप …

चंद्रपुरात तरुणाकडून प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने 18 वार

निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर : प्रेमभंगातील जीवघेणा प्रकार आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या ब्राह्मणी-तुकूम रस्त्यावर पाहायला मिळाला. एका प्रियकराने प्रेयसीवर चाकूने तब्बल 18 वार केले. प्रियकराने विषप्राशन करून स्वतःला संपविण्याचाही प्रयत्न केला. दोघानांही गंभीर अवस्थेत वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलीच्या घरच्यांनी प्रेमाला विरोध केला होता आणि त्यातूनच या मुलाने तिच्यावर सपासप 18 वार केले.

प्रेमाचा हा थरार चिमूरपासून 10 किमी अंतरावरील नंदारा गावापासून एक किमी अंतरावरील शेत शिवारात घडला. चिमूर तालुक्यातील नंदारा येथील चेतन सुरेश गजभे याचं एका महाविद्यालयीन मुलीवर प्रेम होतं. चेतनने मुलीच्या घरच्यांकडे लग्नाची मागणी केली, पण त्यांनी नकार दिला.

संतापलेल्या चेतनने गावाशेजारी दबा धरून महाविद्यालयात जाणाऱ्या प्रेयसीवर चाकूने वार केले. घाबरलेल्या मैत्रिणींनी गावात जाऊन घडला प्रकार सांगितला. इकडे चेतन याने स्वतःजवळची विषाची बाटली पिऊन स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांनाही तात्काळ चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. गंभीर अवस्थेतील मुलीला नागपूर येथे नेण्याचा सल्ला देण्यात आलाय. तर चेतनवर चिमूर येथे प्रथमोपचार पूर्ण करून जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *