बहीण आणि भाचीला वाचवू शकलो नाही, भावाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

बीड : बहीण आणि भाचीचा मृत्यू सहन न झालेल्या सख्ख्या चुलत भावाने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. ज्ञानेश्वर विठ्ठठल बोबडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वरच्या बहिणीने औरंगाबाद येथे काही दिवासंपूर्वी पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. या घटनेने विरह सहन न झालेल्या ज्ञानेश्वरने विहिरीत उडी मारुन आत्महत्या …

बहीण आणि भाचीला वाचवू शकलो नाही, भावाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

बीड : बहीण आणि भाचीचा मृत्यू सहन न झालेल्या सख्ख्या चुलत भावाने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. ज्ञानेश्वर विठ्ठठल बोबडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वरच्या बहिणीने औरंगाबाद येथे काही दिवासंपूर्वी पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. या घटनेने विरह सहन न झालेल्या ज्ञानेश्वरने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. “मी बहीण आणि भाचीला वाचऊ शकलो नाही.” असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. केज तालुक्यातील बोबडेवाडी येथे ही घटना घडली.

औरंगाबाद येथे 17 फेब्रुवारी रोजी सख्ख्या चुलत बहिणीने स्वतःच्या वाढदिवशीच तीन वर्षांच्या मुलीची हत्या करुन, नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून ज्ञानेश्वर बोबडे बेपत्ता झाला होता. आज त्याचा मृतदेह बोबडेवाडी शिवारातील विहिरीत आढळून आले.

“मी माझ्या बहिणीला व भाचीला वाचवू शकलो नाही, म्हणून आत्महत्या करीत आहे.” असे ज्ञानेश्वरने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

चुलत बहीण आणि भाचीच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर बेपत्ता होता. त्याच दिवशी त्याने घर सोडले होते. तो कुठे गेला याची माहिती कुणालाच नव्हती. अनेक पाहुण्यांना आणि मित्रांना विचारणा केली. मात्र त्याचा पत्ता कुठेच लागला नाही. वडिलांनी मुलगा घरातून गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.

दरम्यान, आज शेळ्या सांभाळणाऱ्या एका व्यक्तीला बोबडेवाडी शिवारातील लंगर पट्टा नावाने ओळखल्या जात असलेल्या भागात विहिरीच्या कडेला चप्पल आणि त्यासोबत एक चिट्ठी आढळून आली. चिठ्ठीत “मी माझ्या बहिणीला आणि भाचीला वाचवू शकत नसल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे” असा उल्लेख आढळून आला. ही माहिती केज पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *