आत्मनिर्भर रितेशचं लग्न जमेना, महिन्याला 30-40 हजाराची कमाई, तरीही मुलीचा होकार मिळेना!

आत्मनिर्भर रितेशचं लग्न जमेना, महिन्याला 30-40 हजाराची कमाई, तरीही मुलीचा होकार मिळेना!
रितेश झुणके याने आपली खाजगी नोकरी सोडून स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला. त्याने एक मालवाहू गाडी घेतली त्यावर चांगली कमाई करत मग त्याने एक इनोव्हा गाडी घेतली. रितेशचा व्यवसाय सध्या जोरात चालत असून तो महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमावतो.

तेशच्या व्यवसायाच्या गाडीने चांगलाच वेग पकडला असला तरी गेल्या पाच वर्षांपासून त्याच्या 'लग्नाची गाडी' मात्र पिकअपच घेत नाही. | marriage proposal due to Dirver occupation

Rohit Dhamnaskar

|

Feb 22, 2021 | 3:50 PM

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी देशातील नागरिकांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, नागपुरात आत्मनिर्भर असलेल्या एका तरुणाचे लग्न (Marriage) होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. रितेश झुणके असे या तरुणाचे नाव असून स्वत:च्या व्यवसायाच्या बळावर तो आत्मनिर्भर झाला आहे. मात्र, याच कारणामुळे आता त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाहीत. (Youth in Nagpur facing problems girl denied marriage proposal due to Dirver occupation)

रितेश झुणके याने आपली खाजगी नोकरी सोडून स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय थाटला. त्याने एक मालवाहू गाडी घेतली त्यावर चांगली कमाई करत मग त्याने एक इनोव्हा गाडी घेतली. रितेशचा व्यवसाय सध्या जोरात चालत असून तो महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमावतो. एकत्र कुटुंबात राहत असलेल्या रितेशच्या व्यवसायाच्या गाडीने चांगलाच वेग पकडला असला तरी गेल्या पाच वर्षांपासून त्याच्या ‘लग्नाची गाडी’ मात्र पिकअपच घेत नाही.

मेळावे, मेट्रिमोनिअल साईट सर्वांकडून नकार

रितेशने आतापर्यंत मेट्रिमोनिअल साईट , त्याच्या समाजाचे वधुवर मेळावे आणि समाजातील ओळखीतून आतापर्यंत लग्नासाठी अनेक प्रयत्न केले. जवळपास 500 च्या वर मुलींना त्याने आणि परिवाराने संपर्क केला. मात्र, रितेशला आतापर्यंत एकाही मुलीचा त्याला होकार मिळालेला नाही. कोणाला त्याचा व्यवसाय आवडत नाही, तर कोणाला तो जॉईंट फॅमिली चालत नाही त्याला नोकरी नाही म्हणून मुली त्याला नकार देतात. पण त्याची कमाई आणि इतर बाबी का बघत नाही? नोकरी करणाराच सुखी असतो का, असा प्रश्न रितेशचे कुटुंबीय विचारतात.

नोकरी नसल्याने बहुतांश मुलींचा नकार

जास्तीत जास्त मुलींनी त्याला नकार यासाठी दिला की तो नोकरी करत नाही. त्याच्या बायोडाटामध्ये ड्रायव्हर असा पेशा लिहला आहे. मात्र, रितेश उच्चशिक्षित आहे, पैसे चांगले कमावतो आणि त्याचे घरी चांगले आहे. स्वतः आत्मनिर्भर आहे मात्र हे सगळं ऐकून तो त्रस्त झाला मात्र तो लग्न करण्यासाठी मी माझा व्यवसाय सोडून नोकरी करणार नाही. मला भविष्यात मोठा व्यावसायिक व्हायचे आहे. त्याकरिता मी स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केलेला आहे. मी माझ्या उद्देशापासून भरकटणार नाही हा त्याचा निर्धार आहे.

संबंधित बातम्या:

अनोखा लग्न सोहळा, कन्यादान गृहमंत्र्यांकडून तर पालकत्व घेणार जिल्हाधिकारी

लग्न समारंभात तंदुर बनवणाऱ्यानं असं काही केलं की तुम्ही शिव्या घालाल!

(Youth in Nagpur facing problems girl denied marriage proposal due to Dirver occupation)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें