सापाला जमिनीवर आपटून आपटून मारले, व्हिडीओ व्हायरल

ठाण्याजवळील उल्हासनगर भागात एक तरुण सापाला हातात पकडून रस्त्यावर आपटताना दिसत आहे. ही विकृत कृती करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सापाला जमिनीवर आपटून आपटून मारले, व्हिडीओ व्हायरल

ठाणे : आपण आपल्या आजूबाजूला प्राण्यांचा छळ करणारे अनेक विकृत पाहतो. अशाचप्रकारची विकृत कृती करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ठाण्याजवळील उल्हासनगर भागातील आहे. यात तरुण सापाला हातात पकडून रस्त्यावर आपटताना दिसत आहे. अफताब अन्सारी असं या तरुणाचं नाव आहे.

बोट क्लबजवळील एकता कॉलनीत एका घरात 8 ते 10 फुटांचा साप आढळला. त्यावेळी हा व्हिडीओ काढला आहे. सुरुवातीला व्हिडीओ पाहताना तो तरुण सर्पमित्र असल्यासारखे वाटते. मात्र, नंतर तो जे काही कृत्य करतो, ते तो विकृत असल्याचेच सिद्ध करतो.

अफताबने घरात निघालेला साप हातात पकडला आणि दूर सोडण्याऐवजी तेथेच जोरजोरात रस्त्यावर आपटला. जोरदारपणे रस्त्यावर आपटल्याने जखमी होऊन संबंधित साप मृत झाल्याचेही दिसत आहे.

सापाला आपटून मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागानेही कारवाई केली आहे. आरोपी अफताब अन्सारीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आरोपी अफताबने साप घरात घुसल्यानं लहान मुलं घाबरली होती, असे सांगितले. तसेच मुलांना वाचवण्यासाठी आपण सापाला मारल्याचा युक्तीवाद केला आहे. त्याच्या या कृत्याचा प्राणीप्रेमींकडूनही निषेध केला जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *