गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी, मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर: कोल्हापुरात आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन मजुरानं आत्महत्येचा प्रयत्न केला. ही भयंकर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कसबा वळवा इथं आज सकाळी ही घटना घडली. गौतम मल्लू कांबळे असं या कामगाराचं नाव आहे. या घटनेत तो गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गौतम …

गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी, मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर: कोल्हापुरात आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन मजुरानं आत्महत्येचा प्रयत्न केला. ही भयंकर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कसबा वळवा इथं आज सकाळी ही घटना घडली. गौतम मल्लू कांबळे असं या कामगाराचं नाव आहे. या घटनेत तो गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गौतम कांबळे हा 22 वर्षीय तरुण करवीर तालुक्यातील तामगाव इथला रहिवासी आहे. तो राधानगरी तालुक्यातील कसबा वळवा इथल्या गुऱ्हाळावर मजुरी करत होता. हे गुऱ्हाळ सचिन शिवाजी पाटील यांच्या मालकीचं आहे. इथे तो गेल्या चार महिन्यांपासून कामाला होता.

नेहमीप्रमाणे गुऱ्हाळच्या चुलीत वाळलेले उसाचे चिप्पाडे टाकण्याचे काम तो करत होता. मात्र आज सकाळी त्याने अचानक उकळत्या काहिलीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे थरारक दृश्य गुऱ्हाळातील दुसरा कामगार रघुनाथ वाळवेकर यांनी पाहिलं आणि आरडाओरडा केला. पण काहील उकळत असल्याने उपस्थित कोणाला काहीच करता येत नव्हतं. अखेर गौतमला कसंबसं बाहेर काढून तातडीने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. गौतम 95 टक्के भाजला आहे.

हा सर्व थरार गुऱ्हाळातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *