अमरावतीत शिवसेना खासदार अरविंद सावंतांविरोधात युवा स्वाभिमानच्या महिलांचे आंदोलन

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा सभागृहात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते (Yuva Swabhimani Women Protest).

अमरावतीत शिवसेना खासदार अरविंद सावंतांविरोधात युवा स्वाभिमानच्या महिलांचे आंदोलन
Amravati Protest
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 3:32 PM

अमरावती : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Yuva Swabhimani Women Protest) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा सभागृहात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यामुळे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा केला होता. यानंतर नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अरविंद सावंत यांची तक्रार केली होती (Yuva Swabhimani Women Protest Against Shivsena MP Arvind Sawant In Amravati).

एका महिला खासदाराला धमकी दिल्याने अमरावतीत याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. आज अमरावतीत नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ युवा स्वाभिमान संघटनेच्या शेकडो महिलांनी एकत्र येत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना खासदार सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांचा निषेध करण्यात आला.

यावेळी एका महिला खासदाराचा वारंवार अपमान शिवसेना करत असून शिवसेनेने आमच्या नेत्या नवनीत राणा यांना धमकी देऊ नये, अन्यथा याला चोख प्रत्युत्तर युवा स्वाभिमानच्या महिला देतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मुख्यमंत्री ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्या पोस्टरला काळे फासत शिवसेनेचा निषेध केला. तर, यावेळी उपजिल्हाधिकारी यांना यावेळी महिलांनी निवेदन देत शिवसेना विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या.

नवनीत राणा यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात खासदार नवनीत राणा यांनी तक्रार केलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली. महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत बोलल्यामुळे सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याची तयारीही राणा यांनी केल्याची माहिती मिळत आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याच्या आरोपासह अनेक आरोपांचा समावेश आहे.

नवनीत राणांचे आरोप अरविंद सावंतांनी फेटाळले

“नवनीत राणा यांनी केलेला आरोप साफ खोटा आहे. त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. एकतर त्या महिला आहेत आणि मी शिवसैनिक आहे. आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाहीत. जरी धमकावलं असं त्या म्हणत असतील तर त्या ठिकाणी आजुबाजूला कुणी असतील तर ते सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत आहे ती बरोबर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांची बोलण्याची पद्धत, शैली ही अतिशय घृणास्पद असते. आजही त्या त्याच पद्धतीने बोलत होत्या”, असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

नवनीत राणा यांची तक्रार काय?

महाराष्ट्रात सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे प्रकरण, तसंच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडती कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. “तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू”, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे (Yuva Swabhimani Women Protest Against Shivsena MP Arvind Sawant In Amravati).

आज ज्या प्रकारे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा फक्त माझा अपमान नाही तर माझ्यासह संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करते, असं पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि दिल्ली पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.

Yuva Swabhimani Women Protest Against Shivsena MP Arvind Sawant In Amravati

संबंधित बातम्या :

पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले नाही, नवनीत राणांनी चाकणकरांना सुनावलं

Breaking : शिवसेना खासदार अरविंद सावंतांविरोधात नवनीत राणांची तक्रार, संसदेच्या लॉबीमध्ये धमकावल्याचा आरोप!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.