चंद्रपूर आणि गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळा सुरु होणार, विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे (ZP School opening in Chandrapur Gadchiroli).

चंद्रपूर आणि गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळा सुरु होणार, विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 4:45 PM

नागपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे (ZP School opening in Chandrapur Gadchiroli). पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत घोषणा केली. 4 ऑगस्टपासून या दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद शाळा सुरु करण्यात येणार आहेत.

चंद्रपूर आणि गडचिरोली दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. सोबतच या जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणाची आवश्यक साधनं नसल्याने ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. याचाच विचार करुन या दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

स्वतः विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला आहे. कोविड संदर्भातील सर्व नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील, असंही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं. तसेच शाळांसाठी स्वतंत्र नियमावली बनवली जाईल, असंही सांगितलं.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 260 वर पोहचली आहे. शुक्रवारी (18 जुलै) दिवसभरात नव्याने 17 कोरोना रुग्णांची नोंद झाली. सध्या 112 सक्रिय कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत उपचारानंतर 148 जण कोरोनामुक्त झाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दुसरीकडे गडचिरोलीत देखील नव्याने 73 कोरोना रुग्णांची नोंद झाली. काल 4 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 113 झाली आहे. तसेच सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 216 आहेत. गडचिरोलीत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 330 वर पोहचली आहे.

हेही वाचा :

Corona Community Spread | भारतात बिकट स्थिती, कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू

Mumbai Corona | आधी धारावी आता संपूर्ण मुंबईत कोरोना नियंत्रणात, पालिकेच्या 15 टिप्स!

ZP School opening in Chandrapur Gadchiroli

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.