FD वरील व्याजदर कोणत्या बँकांनी वाढविला, तुमचा फायदा होणार का? जाणून घ्या  

सुरक्षित परताव्याची हमी म्हणून मुदत ठेव योजनेकडे बघितले जाते. एफडीवर सुरक्षा आणि परतावा दोन्ही मिळत असल्याने गुंतवणुकदार रिस्कफ्री गुंतवणूक म्हणून एफडीचा पर्याय निवडतात.

FD वरील व्याजदर कोणत्या बँकांनी वाढविला, तुमचा फायदा होणार का? जाणून घ्या  
money
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 8:51 AM

नवीन वर्षासोबत नवीन संकल्प सुरु होतात. प्रत्येकाचे नवीन वर्षासोबत प्लॅनिंग, नियोजन असते, गुंतवणुकदारांची ही स्वप्न असतात. भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अधिकचा परतावा मिळावा यासाठी गुंतवणुकदार पर्यायांच्या शोधात असतात. या वर्षात तुम्ही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोग पडेल.

यंदा मुदत ठेवीवर जास्त व्याज मिळण्याची शक्यता आहे. तर बँकेतील ठेवीवरही व्याजदर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स यांनी एफडीवरील व्याज दरात यापूर्वीच वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहक या बँकांच्या एफडीकडे आकर्षित झाले आहे.

एचडीएफसी आणि बजाज फायनान्सची एफडीवरील व्याजदरात वाढ

बजाज फायनान्सने मोठ्या कालावधी नंतर एफडीतील व्याजदरात 30 पाईंटची वाढ केली आहे. 24 ते 35 महिन्यांसाठी मुदत ठेव योजनेत 6.35 हून व्याजदर 6.65 टक्के मिळणार आहे. तर 36 ते 60 महिन्यांच्या एफडीवरील व्याज 6.75 हून व्याजदर 7.05 टक्के व्याज झाला आहे. तर दुसरीकडे एचडीएफसी बँकेने एक आणि दोन वर्षांच्या एफडीवर 5 पॉईंट व्याज वाढविले आहे. आता 4.85 हून व्याजदर 4.90 टक्के झाले आहे. तर दोन वर्षांपेक्षा अधिक एफडीवरील व्याजदरातही ही चांगली वाढ करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेचे व्याज 4.50 टक्क्यांहून 5.15 टक्के करण्यात आले आहे.

कर्ज महागणार

कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेटी गाडी रुळावरुन घसरली होती. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी अनेक देशांनी उपाययोजना राबविल्या. कर्ज स्वस्त करण्यात आले. चलनी नोटा छापण्यात आल्या. परंतु, आता कर्ज महाग होण्यास सुरुवात झाली आहे, युरोपातून याची सुरुवात झाली आहे. तर अमेरिकेतून  येणा-या बातम्यांनुसार 2022 मध्ये तीनदा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

रेपो रेट 4 टक्के कायम

मे 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 4 टक्के कायम ठेवला होता. त्याचा परिणाम देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियावर झाला. जानेवारी 2020 मध्ये एसबीआयने मुदत ठेवीवर 6.10 टक्के व्याज दिले तर सध्या व्याजाचा हा दर 4.90 टक्के इतका आहे. तर महागाई दर 5 टक्के इतका आहे. क्रेडेंस वेल्थ एडवायझर चे सीईओ कीर्तन शहा यांच्या म्हणण्यानुसार, मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीत गुंतवणूक करण्याऐवजी अल्प मुदतीचा विचार करावा. त्यामुळे व्याजदर वाढीचा तुम्हाला फायदा होईल. दीर्घ मुदतीत रक्कम गुंतलेली असल्याने ती काढल्यास दंडही भरावा लागतो. त्यामुळे अल्प मुदतीची ठेव निवडणे फायद्याचे ठरते. कोरोनाचे नवे नवे रुप आणि व्हेरियंट बघायला मिळत असल्याने मनी 9 च्या सल्ल्यानुसार, व्याजदर हळूहळू वाढतील. गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करताना महागाईची ही विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या गरजा भागल्यानंतर उरलेल्या रक्कमेतून गुंतवणूक करणे हितकारक असेल .

इतर बातम्या:

Happy Birthday Vidya Balan | करिअरची संघर्षमय सुरुवात, ‘सिल्क स्मिता’च्या भूमिकेने विद्या बालनला प्रसिद्धी मिळवून दिली!

नाशिकमध्ये बनावट दागिने तारण ठेऊन बँकेला 24 लाखांचा गंडा, चौघांविरोधात गुन्हा दाखल

fixed depositors investors can expect higher interest rates know which banks increased interest rates

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.