MOVIE REVIEW : ‘हाऊसफुल 4’ डोक्याला ताप

अक्षयचं स्टारडम, डझनभर कलाकार यामुळे या सिनेमाच्या याआधीचे तिन्ही भाग हिट झाले आहेत. यावेळेस मात्र सगळा आनंदी आनंद (Housefull 4 Movie review) आहे.

MOVIE REVIEW : 'हाऊसफुल 4' डोक्याला ताप
Follow us
| Updated on: Oct 26, 2019 | 8:41 PM

मुंबई : अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, क्रिती खऱबंदा, पूजा हेगडे, जॉनी लिव्हर, चंकी पांडे, राणा दग्गुबती, रणजीत अशी भलीमोठी स्टारकास्ट असल्यावर विचार करा काय अपेक्षित असेल. पण ‘हाऊसफुल 4’ पण डोक्य़ाला ताप (Housefull 4 Movie review) आहे. तगडी स्टारकास्ट घेतली, भरपूर पैसा खर्च केला, अर्ध्या कपड्यात हिरोईन्स दाखवल्या, माकडचाळे करणारे विनोद दाखवले की सिनेमा हिट असा निर्माता-दिग्दर्शकांनी का समज केला आहे हेच मला कळत नाही. प्रेक्षकांना गृहीत धरुन 2.30 तास त्यांच्यावर अत्याचार करण्याचं धाडस कसं काय यांना होतं हे अजूनही न उलगडलेलं कोडं (Housefull 4 Movie review) आहे. मुळातच हाऊसफुल फ्रॅचाईसीमधला एकही सिनेमा मला आवडलेला नाही. त्यातल्या त्यात हाऊसफुल 2 जरा बरा होता. या फ्रॅंचाईसीचं नशीब की अक्षयचं स्टारडम, डझनभर कलाकार यामुळे या सिनेमाच्या याआधीचे तिन्ही भाग हिट झाले आहेत. यावेळेस मात्र सगळा आनंदी आनंद (Housefull 4 Movie review) आहे.

एक तर निर्माता-दिग्दर्शक प्रचंड हुशार आहेत किंवा त्यांनी प्रेक्षकांना महामुर्ख समजलं आहे. असो, तर हा बिनडोकं चित्रपट तुम्हाला हसवण्यात जराही यशस्वी होत नाही. विनोदाच्या नावावर जी काही नॉनसेन्स कॉमेडी चालते त्याने तुम्हाला स्वत:चं डोकं फोडून घ्यावसं वाटतं. एखादी फ्रँचाईसी हिट ठरली की लगेचच त्याचा सिक्वेन्स करण्याचा जणू पायंडाच पडला आहे. मग त्याच्या पुढच्या भागांमध्ये काहीही पेरलं की प्रेक्षक ते चवीने चाखतील हा समज कधी दूर होईल हे देवचं जाणे.

लंडनमध्ये या चित्रपटाची कथा सुरु होते. हेअरड्रेसर हॅरीकडून (अक्षय कुमार) खतरनाक डॉन माईकल (मनोज पाहवा)चे पाच लाख मिलियन डॉलर्स हरवतात. आता ते कसे हरवतात ते तुम्हीच बघा. मग माईकल, त्याची गॅंग हॅरी आणि त्याचे मित्र मॅक्स (बॉबी देओल) आणि रॉकी (रितेश देशमुख)च्या हातधुवुन मागे लागतात. आता माईकल बाईचे पैसे परत करण्यासाठी हॅरी आणि त्याची गॅंग गर्भश्रीमंत ठकराल (रणजीत)च्या मुलींना प्रेमाच्या जाण्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करण्याचा निश्चय करतात. त्यानुसार क्रिती (क्रिती सनन), पूजा (पूजा हेगडे) आणि नेहा (क्रिती खरबंदा) या तिघीही मॅक्स, हॅरी आणि रॉकीच्या प्रेमात पडतात. हॅरीला आवाजाची समस्या आहे. कुठलाही मोठा आवाज झाला की त्याची स्मृती हरवते, शिवाय त्याला चित्रविचित्र स्वप्ने पडतात. ज्यात तो कुठल्या तरी जुन्या काळातील दृश्ये पाहत असतो. असो. तिघी नायिकांना डेस्टिनेशन वेडिंग करायचं असल्यामुळे ही वरात लंडनहून सितमगढला येऊन धडकते. आता सितमगढला आल्यावर हॅरीला 600 वर्षांपूर्वीचा आपला भूतकाळ आठवतो.

मग कथानक जातं 1419 मध्ये. तेव्हा हॅरी सितमगढचा राजकुमार बालादेव सिंग असतो. तर मॅक्स धरमपुत्र आणि रॉकी बांगडु महाराज. तर क्रिती, पूजा आणि नेहा असतात राजकुमारी मधु, माला आणि मीना. हॅरीला त्याचा भूतकाळ आठवण्य़ात त्याचा विश्वासू नोकर आखरी पास्ता(चंकी पांडे) मदत करतो. आता तेव्हा असं काय घडतं की त्यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहते? 600 वर्षांनंतर त्यांची प्रेमकहाणी पूर्ण होते का? या सगळ्यात काय गोंधळ उडतो? हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला हाऊसफुल 4 बघावा (Housefull 4 Movie review) लागेल.

पूनर्जन्माच्या कथानकावर आधारित पहिला विनोदी चित्रपट असं या सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं होतं. सिनेमात प्रत्येक पात्राचा पुनर्जन्म झालेला दाखवला आहे. सिनेमाचं कथानक अत्यंत गुंतागुंतीचं आणि कमकुवत आहे. कमकुवत पायावर जर कळस चढवण्याचा अट्टहास केला तर काय होतं याचं हा सिनेमा उत्तम उदाहरण. फरहाद सामजीचं अत्यंत वाईट आणि बालिश दिग्दर्शन हे या सिनेमाचा फियास्को होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण. अत्यंत वाईट पध्तीनं त्यानं हा सगळा ‘तमाशा’ मांडला आहे.

1419 आणि 2019 अशा दोन कालखंडात या सिनेमाचं कथानक घडतं. आता 1419 मध्ये ‘बाला बाला’ गाण्यावर अक्षय डान्स करतो हे बघून हसावं की रडावं ते कळत नाही. आता 1419 मध्ये नेमकं कसं वातावरण होतं हे काल्पनिक आहे. ते तुम्ही किंवा मी बघितलेलं नाही. पण बाला बाला गाणं शैतान का साला म्हणून दाखण्याइतकी पण दळभद्री कल्पनाशक्ती वापरणं म्हणजे कहर आहे. असे अनेक अकलेचे तारे या सिनेमात तोडण्यात आलेत. सिनेमात इतका गोंधळ उडतो की दिग्दर्शक ही चित्रपट पूर्ण होता होता कन्फ्यूज झालेला दिसतो. आज मेरा फास्ट हे इसलिए स्लो मारा, कबुतर का यक ब्रिंग्स गुड लक, मा का साया नही है और मुंडन के बाद सर पर छाया नही है, इसने जेंडर का टेंडर नही भरा यासारखे पांचट वन लायनर बघून तुम्हाला अजिबात हसू येणार नाही. हमशक्ल, तीस मॉर खान, जोकर या सिनेमांची आठवण हा सिनेमा बघताना येते.

अक्षय कुमारनं एकट्याच्या खांद्यावर हा सगळा डौलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. पण एकटा अक्षयही ही नौका बुडण्यावाचवून वाचवू शकलेला नाही. बऱ्याच ठिकाणी तोही लाऊड वाटतो. अक्षयनं का म्हणून हा सिनेमा स्वीकारला हा प्रश्न पडला आहे. तीस मार खान, जोकर या सिनेमांचं उदाहरण असूनही केवळ फ्रॅचाईसीच्या प्रेमापोटी अक्षयनं हा सिनेमा स्वीकारला का हा खरंच मोठा प्रश्न आहे. रितेश देशमुख जे वर्षानुवर्षापासून करतोय तेच त्याने या सिनेमात केलंय. बॉबी देओल काय करतोय हे त्यालाही कळलेलं (Housefull 4 Movie review) नसावं.

तीन हिरोईनमध्ये क्रिती सॅननं चागंलं काम केलंय. तिचा कॉमिक टायमिंगही उत्तम आहे. क्रिती खरबंदाला आपली डॉयलॉग डिलिव्हरी सुधारावी लागणार आहे. तर पूजा हेगडेला अभिनयात अजून बरीच सुधारणा करण्याची गरज आहे. तिचा कॉमिक टायमिंग खूपच वाईट आहे. चंकी पांडेने भूमिका निवडताना आता विचार करण्याची गरज आहे. राणा, नवाझ, मनोज पाहवा, रणजीत आणि ज़ॉनी लिव्हरला सिनेमात वेस्ट घालवलं आहे. शरद केळकरनं मात्र सिनेमात आपली छाप सोडली आहे. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. संगीतही ठिकठाक आहे. बाला गाणं तर आधीच सुपरहिट झालं होतं. चुम्मा आणि भूतराजा ही गाणी चांगली जमून आली आहे.

एकूणच काय हाऊसफुल 4 या फ्रॅचाईसीमधला हा सगळ्यात कमकुवत सिनेमा आहे. हा सिनेमा बघणं म्हणजे निव्वळ टाईम वेस्ट घालवणं आणि मनस्ताप करुन घेणं आहे.

‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला दोन स्टार्स

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.