REVIEW : कसा आहे इम्रान हाश्मीचा Why Cheat India?

बॉलिवूडमध्ये शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारे तारे जमीन पर, थ्री इडियट्स, नील बटे सन्नाटा, आरक्षण असे अनेक चित्रपट आलेत. पण इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हाय चीट इंडिया’मध्ये (Why Cheat India) शिक्षणक्षेत्रातील ‘चिटिंग माफीया’चा पर्दाफाश करण्यात आलाय. चित्रपटाचा विषय वेगळा आणि वास्तववादी असल्यामुळेच इम्रानने या चित्रपटात अभिनयासोबतच निर्मितीचीही धुरा सांभाळली. आपल्या सीरियल किसर या इमेजमधून बाहेर पडण्याचा […]

REVIEW : कसा आहे इम्रान हाश्मीचा Why Cheat India?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

बॉलिवूडमध्ये शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारे तारे जमीन पर, थ्री इडियट्स, नील बटे सन्नाटा, आरक्षण असे अनेक चित्रपट आलेत. पण इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हाय चीट इंडिया’मध्ये (Why Cheat India) शिक्षणक्षेत्रातील ‘चिटिंग माफीया’चा पर्दाफाश करण्यात आलाय. चित्रपटाचा विषय वेगळा आणि वास्तववादी असल्यामुळेच इम्रानने या चित्रपटात अभिनयासोबतच निर्मितीचीही धुरा सांभाळली.

आपल्या सीरियल किसर या इमेजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न इम्रानने या चित्रपटाद्वारे केलाय. चित्रपटाची कथा राकेश सिंग उर्फ रॉकीच्या भवती फिरते. राकेश शिक्षण क्षेत्रातील असा माफीया आहे, जो श्रीमंत घरातील मुलांकडून एंट्रन्स परीक्षा पास करुन देण्यासाठी भलीमोठी रक्कम घेत असतो. शिक्षण क्षेत्रातील त्रुटींचा तो पूर्णपणे फायदा घेतो. गरीब होतकरु हुशार विद्यार्थ्यांना हेरुन त्यांना एंट्रन्स परीक्षांना डमी बसवण्याचा ‘चीट’ व्यवसाय राकेश करतो. यामध्ये अनेक बड्या व्यक्तींचा वरदहस्त राकेशला लाभलेला असतो. पण अचानक अशी घटना घडते की ज्यामुळे राकेशची पोलखोल होऊन तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतो..पुढे काय होतं?  राकेशला शिक्षा होते का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल..

लेखक-दिग्दर्शक सौमिक सेनने चित्रपटासाठी निवडलेला विषय चांगलाय पण चित्रपटाला योग्य ती ट्रीटमेंट देण्यात तो कमी पडलाय. त्यामुळेच हा चित्रपट मनाला भिडत नाही. काही सीनमध्ये प्रचंड गोंधळ वाटतो..

चित्रपटाची संपूर्ण मदार इम्रान हाश्मीच्या खांद्यावर आहे. त्याने संपूर्ण चित्रपटात अफलातून बँटिंग केलीय. एक वेगळाच इम्रान या चित्रपटात दिसलाय. श्रेया धन्वंतरी हा नवा चेहरा चित्रपटात इम्रानच्या अपोझिट झळकलाय. श्रेयाने साकारलेली नुपूर लाजवाब..पण फक्त कलाकारांचा उत्तम अभिनय चित्रपट तारु शकत नाही. चित्रपटाची मांडणीही उत्तम हवी. आणि मांडणीतच हा सिनेमा फसलाय. हा चित्रपट मध्यांतरापर्यंत संथ गतीने पुढे सरकतो. मध्यंतरानंतर थोडा वेग पकडतोय असं वाटत असतांना पुन्हा ट्रॅकवरुन उतरतो आणि घाईगडबडीत शेवट उरकून संपतो. चित्रपट अजून रंगवता आला असता पण दिग्दर्शक चित्रपट रंगवण्यात अयशस्वी ठरलाय.

खरंतर चित्रपटाचा विषय खूपचं गंभीर आहे..पण गोंधळलेलं कथानक; संथ गतीमुळे चित्रपट लवकर पकड घेत नाही. अनेकदा तर  काय चाललंय हेच कळत नाही. दिग्दर्शकानं या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं होतं. बऱ्याच प्रसंगात तर जन्नत; स्पेशल 26; राजा नटवरलाल या चित्रपटातील प्रसंगांचा प्रभाव जाणवतो.

चित्रपटाची अजून एक कमकुवत बाजू म्हणजे याचं संगीत. इम्रान हाश्मीचा चित्रपट म्हटलं म्हणजे त्यातील गाणी आधीच सुपरहिट झालेली असतात. पण या चित्रपटातील सहा गाण्यांपैकी एकही गाणं लक्षात राहत नाही. एकूणचं काय तर तुम्ही पंचपक्वानांच्या थाळीचा आस्वाद घेण्याच्या इराद्याने जाल आणि वरण भातावरच तुम्हाला समाधान मानावं लागेल त्यातला हा प्रकार आहे. एक चांगला चित्रपट होता होता राहिला असं मला राहून राहून वाटतंय..

टीव्ही 9 मराठी रेटिंग : दोन स्टार

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.