केसरी : अक्षय कुमारचा अभिनय आणि सैनिकांच्या शौर्याला सलाम

केसरी हा रंग शौर्याचं प्रतिक मानला जातो. अक्षय कुमारच्या केसरी सिनेमात 36 शिख रेजिमेंट आणि 21 शिख सैनिकांचं शौर्य आणि त्यांचं बलिदान दाखवण्यात आलंय. 1897 मध्ये झालेल्या सारागढी लढाई मोठ्या लढायांपैकी एक मानली जाते. 21 शिख सैनिकांनी इंग्रजांचं राज्य आणि अफगाणी राज्यकर्त्यांचीही झोप उडवली होती. केसरीचे दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी या सिनेमातून दिग्दर्शनाची सुरुवात केली […]

केसरी : अक्षय कुमारचा अभिनय आणि सैनिकांच्या शौर्याला सलाम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

केसरी हा रंग शौर्याचं प्रतिक मानला जातो. अक्षय कुमारच्या केसरी सिनेमात 36 शिख रेजिमेंट आणि 21 शिख सैनिकांचं शौर्य आणि त्यांचं बलिदान दाखवण्यात आलंय. 1897 मध्ये झालेल्या सारागढी लढाई मोठ्या लढायांपैकी एक मानली जाते. 21 शिख सैनिकांनी इंग्रजांचं राज्य आणि अफगाणी राज्यकर्त्यांचीही झोप उडवली होती. केसरीचे दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी या सिनेमातून दिग्दर्शनाची सुरुवात केली आहे. समीक्षकांकडूनही या सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यात आलं आहे.

सिनेमाची कहाणी

19 व्या शतकातील ही कथा आहे, जेव्हा अफगाणिस्तानला कोणत्याही परिस्थितीत भारतीय भूमीवर स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं होतं. भारतावर तेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती. अफगाणी आणि ब्रिटशांमध्ये संघर्ष चालूच होता. सारागढी (सध्या पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा प्रांतात) मार्गे भारतावर आक्रमण करण्याची योजना अफगाणिस्तानने आखली. एकाच दिवसात सारागढी किल्ला, त्यानंतर गुलिस्तान किल्ला आणि शेवटी लोकहार्ट किल्ल्यावर स्वारी करण्याचं नियोजन होतं. पण गुलिस्तान किल्ल्यात तैनात असलेल्या 21 शिख सैनिकांनी अफगाणींवर मात केली. गुलिस्तान किल्ल्यातील हवालदार इशर सिंह (अक्षय कुमार) च्या नेतृत्वात अफगाणी सैन्याला कशा पद्धतीने धूळ चारली हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जावं लागेल.

अभिनय

प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा अभिनेता अशी अक्षय कुमारची ओळख आहे. पुन्हा एकदा अक्षय कुमारने स्वतःला सिद्ध करुन तर दाखवलंयच, पण प्रेक्षकांच्या मनात त्याच्याविषयी आदर आणखी वाढलाय यात शंका नाही. अक्षय कुमारचे डायलॉग, त्याची अक्शन हे ज्या पद्धतीने साकारलंय ते पाहून अंगावर शहारे येतात. अक्षय कुमारने या सिनेमात भूमिका साकारलेली नाही, तर भूमिका जगणं ज्याला म्हणतात, त्याचा प्रत्यय येतो. परिणीती चोप्राची भूमिका अत्यंत कमी आहे. इतर कलाकारांनीही अक्षय कुमारसोबत मिळून दमदार अभिनय केलाय.

का पाहावा?

विविध कारणांमुळे तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. सिनेमाची कथा ही सर्वात मोठी ताकद आहे. सिनेमा तुम्हाला इतिहासात घेऊन जातोच, शिवाय तुम्हाला भारतीय म्हणून गर्वही वाटतो. शिखांच्या शौर्यावर गर्व वाटेल असा हा सिनेमा आहे. तेरी मिट्टी हे गाणं इमोशनलही करतं. क्लायमॅक्स सीन पाहताना अंगावर अक्षरशः शहारे येतात. सिनेमा कुठेही भटकलेला नाही ही जमेची बाजू आहे. त्यामुळे प्रेक्षक सिनेमाला खिळून राहतात.

रेटिंग : 5/4

सिनेमाचा ट्रेलर पाहा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.