MOVIE REVIEW PANIPAT : जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव ‘पानिपत’

भावनिक नातेसंबंधांतून हळूहळू उलगडत नंतर रणभूमीवरील युद्धाचा थरार अनुभवण्यासाठी तुम्हाला 'पानिपत' बघावा लागेल.

MOVIE REVIEW PANIPAT : जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव 'पानिपत'
Follow us
| Updated on: Dec 06, 2019 | 1:58 PM

पानिपत… मराठा साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम. मराठे पानिपतचं हे युद्ध जरी हरले असले तरी त्यांची शौर्यगाथा आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. हा इतिहास मोठ्या पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचललं आहे ऐतिहासिक सिनेमांमध्ये मास्टरकी असलेल्या आशुतोष गोवारीकर यांनी. ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ नंतर आशुतोषचा सूर हरवला होता. त्यांचे ‘व्हॉट्स युअर राशी’ आणि ‘खेले हम जी जानसे’ डिझास्टर ठरले होते. तर हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘मोहेनजोदारो’ही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नव्हता. पण आता ‘पानिपत’च्या रुपाने गोवारीकर फॉर्ममध्ये परतले आहेत. पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षे उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याला त्याच भव्यतेने मोठ्या पडद्यावर आणण्याची किमया आशुतोष गोवारीकर यांनी केलीय. या गोष्टीला सिनेमॅटिक लिबर्टी घेत (Panipat Moview Review) न्याय देण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे.

दिग्दर्शक म्हणून आशुतोष गोवारीकरांचं व्हिजन क्लीअर होतं. त्यांना पूर्णपणे पानिपतच्या युद्धावर लक्ष केंद्रित करायचं होतं. उदगीरचा किल्ला जिंकून सदाशिवराव भाऊ (अर्जुन कपूर) इब्राहिम खान गारदीला पेशव्यांच्या सैन्यात समाविष्ट करुन घेतात इथून सिनेमाची सुरुवात होते. मध्यांतरापूर्वी सिनेमात मराठ्यांचं साम्राज्य, सदाशिवराव भाऊ व पार्वतीबाई (क्रिती सनॉन) यांची प्रेमकथा, नानासाहेब पेशवे (मोहनिश बहल) यांचा मुलगा विश्वास आणि सदाशिवराव भाऊ यांच्यामधला द्वंद्व, गोपिका बाईंचा (पद्मिनी कोल्हापुरे) सदाशिवराव भाऊ आणि पार्वतीबाईंबद्दल द्वेष, मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीब-उद-दौलाकडून झालेली क्रूर हत्या, त्यामुळे पेटून उठलेले सदाशिवराव भाऊ, मराठ्यांना पराजित करण्यासाठी नजीबने अफगाणिस्तानची राजधानी कंधारचा राजा अहमद शाह अब्दालीला (संजय दत्त) भारतात बोलावणं, या सर्व घटना घडतात. तर मध्यांतरानंतरच्या भागात मराठ्यांनी युद्धाची तयारी कशी केली, पार्वती बाई कशा सदाशिवराव भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या, मराठ्यांचा विश्वासघात कसा झाला-कोणी केला, सकिना बेगमने (झीनत अमान)  मराठ्यांची कशी मदत केली, 40 हजार सैन्य असूनही मराठ्यांनी शौर्याने कसा अब्दालीच्या सैन्य़ाशी सामना केला हे सगळं दाखवलं आहे. भावनिक नातेसंबंधांतून हळूहळू उलगडत नंतर रणभूमीवरील युद्धाचा थरार अनुभवण्यासाठी तुम्हाला ‘पानिपत’ बघावा लागेल.

आशुतोष गोवारिकर आपली गोष्ट सांगताना पुरेपुर वेळ घेतात. त्यात कुठलाही कंजूसपणा ते करत नाही. त्यांच्या इतर सिनेमांप्रमाणेच ‘पानिपत’ची लांबीही 3 तास आहे, पण लांबी एवढी असूनही तुम्हाला अजिबात सिनेमा बघताना बोअर होणार नाही. चित्रपटाचे व्हिजुअल्स, भव्यता, गोष्ट, दिग्दर्शन तुम्हाला गुंतवून ठेवते. हा विषय तीन तासात बसणारा नाही. तरीही चित्रपटाची पटकथा बंदिस्त ठेवल्यामुळे प्रभावशाली ठरते. चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट यातले युद्धाचे सीन्स आहेत. यासाठी सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर सीके मुरलीधरन यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांचा कॅमेरा फिरला आहे, ते निव्वळ अप्रतिम. चित्रपटाचे सेट्स आणि लोकेशन मराठा साम्राज्याची भव्यता दर्शवतात. ऐतिहासिक सिनेमांसाठी कला दिग्दर्शक म्हणून आपणच योग्य असल्याचं नितिन देसाईंनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. शनिवार वाडा असो किंवा दिल्लीचा लाल किल्ला हे हुबेहूब उभारले आहेत. चित्रपटावर पूर्णपणे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांचा प्रभाव सतत जाणवत राहतो.

चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा चित्रपटातील कास्टिंग बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, मात्र गोवारीकरांनी आपल्या कलाकारांकडून उत्तम काम (Panipat Moview Review) काढून घेतलंय. सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेसाठी अर्जुन कपूरने मेहनत घेतलेली जाणवते, पण तरीही तो कमी पडला आहे. इमोशनल सीन्समध्ये अर्जुन प्रभावहीन ठरलाय. बऱ्याच सीन्समध्ये तर क्रिती सॅनन त्याच्यावर भारी पडलीये. युद्धाच्या सीन्समध्ये मात्र त्याचा आक्रमकपणा भावतो. क्रिती सॅनननं सिनेमात कमाल केलीय. पार्वतीबाईंच्या भूमिकेत तर ती सुंदर दिसली आहेच, शिवाय तिने संपूर्ण सिनेमात त्याच ताकदीनं कामही केलंय. त्यांचा हळवेपणा, समंजसपणा, आक्रमकता सगळं लाजवाब. शेवटच्या अॅक्शन सीन्समध्ये तर तिने कमाल केलीय. संपूर्ण सिनेमात तिच्यावरुन नजर हटत नाही. हा सिनेमा क्रितीसाठी टर्निंग पॉईंट ठरेल. अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त क्रूर दिसलाय. पण त्याच्या अफगाणी बोलण्याच्या लहेजावर अजून काम करण्याची गरज होती. त्याचा तो अॅक्सेन्ट बरोबर नाही जमलाय. नानासाहेबांच्या भूमिकेत मोहनिश बहल कमाल. गोपिकाबाईंच्या भूमिकेत पद्मिनी कोल्हापुरे यांनी ओव्हएक्टिंग केली आहे. त्यांच्याकडून अजून चांगलं काम करुन घेता आलं असतं. सकिना बेगमच्या छोट्या भूमिकेत झीनत अमान लक्षात राहतात. सिनेमात मराठी कलाकारांची मोठी फळी आहे. मिलिंद गुणाजी, रवींद्र महाजनी, गश्मिर महाजनी, कृतिका देव, शैलेश दातार, सुहासिनी मुळे, राजेश आहेर, अर्चना निपाणकर, दुष्यंत वाघसह अनेक मराठी कलाकार सिनेमात आहेत. पण जानकोजी शिंदेंच्या भूमिकेत गश्मिर महाजनी आणि मल्हारराव होळकरांच्या भूमिकेत रवींद्र महाजनी सोडले तर इतर मराठी कलाकारांना सिनेमात हवा तसा वाव मिळाला नाही.

ए.आर. रहमान आणि गोवारीकर हे समीकरण ठरलेलं, पण यंदा मराठी मातीतील कथा असल्यामुळे गोवारीकरांनी रहमान ऐवजी अजय-अतुलच्या खांद्यावर संगीताची जबाबदारी सोपवली आहे. सिनेमात तीन गाणी आहेत. तिन्ही मस्त जुळून आली आहेत. विशेषत: ‘मर्द मराठा’ गाणं जबरदस्त झालंय. ‘सपना ये सच है’ हे गाणंही मस्त जमून आलंय. गाण्यांमध्येही भव्यता दिसते. एकूणच काय मराठी कलाकारांना योग्य वाव मिळाला असता, सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत कदाचित दुसरा अभिनेता असता, अब्दालीच्या बोलीवर काम केलं असतं तर या सिनेमानं अजून उंची गाठली असती. तरीही ही कथा आपल्या मातीतील आहे. त्यामुळे मराठ्यांची ही शौर्यगाथा बघायलाच हवी.’ टीव्ही नाईन मराठी’कडून (Panipat Moview Review) या सिनेमाला मी देतोय चार स्टार्स. 

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.