REVIEW : मनोरंजनाची सफर घडवणारा ‘वेडिंगचा शिनेमा’

लग्न म्हंटलं म्हणजे दोन कुटुंब, संस्कृती, परंपरांचं मिलन. दोन भिन्न संस्कृतीतली माणसं एकत्र आली की त्यांच्यात काहीतरी मतभेद होणार, काही प्रसंगानुरुप गंमतीजंमती घडणार, रुसवे-फुगवे, मानापमान नाट्यही पार पडणार. हा सगळा मसाला आपण आतापर्यंत बॉलिवूडसह मराठी चित्रपटातही बऱ्याचदा बघितलाय. डॉ. सलील कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘वेडिंगचा शिनेमा’ ही याच पठडीतला. त्यामुळे तिच रटाळवाणी टीपिकल फिल्म […]

REVIEW : मनोरंजनाची सफर घडवणारा 'वेडिंगचा शिनेमा'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

लग्न म्हंटलं म्हणजे दोन कुटुंब, संस्कृती, परंपरांचं मिलन. दोन भिन्न संस्कृतीतली माणसं एकत्र आली की त्यांच्यात काहीतरी मतभेद होणार, काही प्रसंगानुरुप गंमतीजंमती घडणार, रुसवे-फुगवे, मानापमान नाट्यही पार पडणार. हा सगळा मसाला आपण आतापर्यंत बॉलिवूडसह मराठी चित्रपटातही बऱ्याचदा बघितलाय. डॉ. सलील कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘वेडिंगचा शिनेमा’ ही याच पठडीतला. त्यामुळे तिच रटाळवाणी टीपिकल फिल्म आपल्याला बघायला मिळणार की काय असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. पण हा सगळा भ्रम खोटा ठरवत हा ‘शिनेमा’ मनोरंजनाची वेगळीच सफर घडवतो. सध्या प्री-वेडिंगचा ट्रेण्ड आहे, याच ट्रेण्डची लोकप्रियता या चित्रपटात कॅश करण्यात आली आहे. प्री-वेडिंग शूट करतांनाची धमाल, गुंता, कॉर्पोरेट कंपन्यांचा यातला वाढता हस्तक्षेप, वधु-वरासाठी प्री-वेडींग म्हणजे एक सुखद क्षण पण कॉर्पोरेट कंपन्यांसाठी फक्त व्यवसाय. सामान्य माणूस आयुष्यात भन्नाट असं काही करु शकणार नाही, तिच हौस प्रीवेडिंगच्या माध्यमातून तो पूर्ण करतो, अशा अनेक गोष्टींवर हा ‘शिनेमा’ प्रकाश टाकतो. दिग्दर्शक म्हणून पहिल्याच चित्रपटात सलीलनं चेंडू सरळ सीमारेषेबाहेर टोलावला आहे. चित्रपटाची कथा साधी-सरळ आहे. पण ती उत्तमरित्या फुलवली आहे.

उर्वी (मुक्ता बर्वे). एक महत्त्वाकांक्षी मुलगी. उर्वीला मोठं दिग्दर्शक व्हायचंय. यासाठी तिचा स्ट्रगलही सुरु आहे. अशातचं मुंबईची परी (ऋचा इनामदार) आणि सासवडच्या पक्याच्या (शिवराज वायचळ) लग्नाच्या प्री-वेडिंग शूटची जबाबदारी उर्वीवर येते. मग सुरु होतो मुंबई-सासवड-मुंबईचा मजेशीर प्रवास. सासवडच्या प्रतिष्ठीत घराण्यातील वेंधळा मुलगा आणि मुंबईची डॉक्टर मुलगी म्हंटल्यावर दोन भिन्न स्वभावाची कुटुंब एकत्र येतात. आबासाहेब सहाने (शिवाजी साटम), आईसाहेब सहाने ( अलका कुबल), डॉ. अनघा इमानदार(अश्विनी काळसेकर), डॉ.समीर इनामदार(सुनील बर्वे), मॅक(प्रविण तर्डे), दिलीप सहाने(संकर्षण), मदन भाळ(भालचंद्र कदम), जम्बो(त्यागराज खाडीलकर), पेंटर(संदिप खऱे), वहिनी(योगिनी पोफळे) अशी सगळी इरसाल, प्रेमळ पात्र या ‘शिनेमा’त एकत्र येतात. आता परी-पक्याची लव्हस्टोरी कशी सुरु होते ? प्री-वेडिंग शूट दरम्यान काय गंमतीजंमती घडतात ? , उर्वीचं दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न पूर्ण होतं का ?, लग्नाच्या या प्रवासात काय गमंती-जंमती घडतात ? काय गोंधळ उडतो ? हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल.

आता एवढ्या सगळ्या कलाकारांना एकाच सिनेमात एकत्र आणणं ही खायची गोष्ट नाही. परंतु सलीलने या सगळ्यांना एकत्र आणण्याची किमया साधली. किंबहुना सलीलवरील प्रेमापोटी हे सगळे या चित्रपटात काम करायला तयार झालेत. चित्रपट म्हटला म्हणजे एक हिरो असतो, एक हिरोईन असते अशी संकल्पना ठरलेली. पण याला सलीलने छेद दिलाय. कारण या सिनेमातील प्रत्येक पात्र हे या सिनेमाचा हिरो आहे. पक्या-परी जरी कथेचा केंद्रबिंदू असले तरी उर्वी, मदन, मॅक, जम्बो, आबासाहेब, आईसाहेब, डॉ. अनघा इनामदार, डॉ. समीर इनामदार प्रत्येकाचीच एक वेगळी गोष्ट आहे. प्रत्येक पात्र त्याच ताकदीनं सिनेमात फुलवण्यात आलंय. विशेषत: भाऊने साकारलेला कॅमेरामन मदन, प्रवीण तरडेंनी साकारलेला मॅक आणि ऑफकोर्स मुक्ता बर्वेनं साकारलेली उर्वी लाजवाब, भन्नाट. भाऊ कदमला देवी देणगीच लाभलीये. कारण त्याची सहज संवादफेक तसेच पडद्यावरील त्याचं असणचं चेहऱ्यावर हास्याची कळी फुलवायला पुरेसं आहे. करीअर की प्रेम या द्विधा मन:स्थितीत असलेली उर्वी मुक्तानं सहज साकारली आहे. बाकी चित्रपटातील सगळ्याच पात्रांनी सिनेमात मजा आणलीये. त्यागराजनं साकारलेला योयो जम्बो तर बढीया ! ऋचा आणि शिवराजच्या खांद्यावर बऱ्यापैकी या सिनेमाची धूरा होती. दोघांनी यशस्वीरीत्या आपल्या भूमिका निभावल्या आहेत.

या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तीरेखा अत्यंत साध्या, सरळ आहेत. बऱ्याच दिवसांनी मराठीत असा खळखळून हसवणारा चित्रपट आलाये. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद, संगीत या बाजूही सलीलने सांभाळल्या आहेत. सिनेमाची कथा जितकी गोड आहे तितकेच यातील संवादही तितकेच खुसखुशीत. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे इतके इरसाल कलाकार असतांना सावळा गोंधळ घालत, चित्रविचित्र प्रसंग दाखवत विनोद निर्मिती करण्याला वाव होता. पण सलीलनं या सगळ्याला केराची टोपली दाखवत प्रासंगिक विनोद असलेला, हसता-हसता डोळ्यात चटकन पाणी आणणारा खरा चित्रपट बनवलाये. यासाठी त्याला हॅटस ऑफ. चित्रपटात दोन-तीन प्रसंग उगाच खेचल्यासारखे वाटतात. जर ते टाळलं असतं तर बरं झालं असतं. सिनेमातील गाणी तर आधीच हिट झाली आहे. विशेषत: ‘बोल पक्या’ हे गाणं मस्त जमून आलंय.

एकूणच काय ‘वेडिंगचा शिनेमा’ हा उत्तम चित्रपट आहे. डॉ.सलील कुलकर्णींनी त्यांची नवी इनिंग यशस्वीरीत्या सुरु केलीये. दोन घटका मनोरंजन त्याचसोबत सगळ्याच कलाकारांचा अफलातुन अभिनय बघण्यासाठी एकदा हा ‘शिनेमा’ थिएटरात जाऊन बघायलाच हवा. टीव्ही नाईन मराठीकडून या सिनेमाला मी देतोय साडे तीन स्टार.

VIDEO : सिनेमाचा ट्रेलर :

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.