अभिनेता रवी किशनला बिल्डरकडून दीड कोटींचा गंडा

मुंबई : रिअल इस्टेट व्यवसायातील अनेक फसव्या दलालांकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आपण ऐकत असतो. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्यालाही मुंबईतील जुहू येथे फ्लॅट देण्याच्या नावाखाली बिल्डर्सनी फसवल्याचं समोर आलंय. भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार रवी किशन याला मुंबईतील वर्सोवा यारी रोड भागात फ्लॅट मिळवून देतो, असं सांगत दीड कोटींना फसवलंय. रवी किशनने याप्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे. […]

अभिनेता रवी किशनला बिल्डरकडून दीड कोटींचा गंडा
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 3:11 PM

मुंबई : रिअल इस्टेट व्यवसायातील अनेक फसव्या दलालांकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आपण ऐकत असतो. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्यालाही मुंबईतील जुहू येथे फ्लॅट देण्याच्या नावाखाली बिल्डर्सनी फसवल्याचं समोर आलंय. भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार रवी किशन याला मुंबईतील वर्सोवा यारी रोड भागात फ्लॅट मिळवून देतो, असं सांगत दीड कोटींना फसवलंय. रवी किशनने याप्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे. भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार रवी किशनला आलिशान घर देण्याच्या नावाखाली एका बिल्डरने दीड कोटी रुपयांना गंडवलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबंधित बांधकाम कंपनीचे तीन संचालक जीतेंद्र जैन, जीनेंद्र जैन आणि करण शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वर्सोवा येथील सुरू असलेल्या प्रकल्पात अभिनेता रवी किशनने घर घेण्यासाठी पैसे गुंतवले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही बिल्डर घराचा ताबा देत नव्हता. रवी किशनने 12 व्या मजल्यावर 3 हजार 165 चौ. फुटांच्या घरासाठी त्यांना दोन वेळा 75 लाख रुपये दिले. मात्र त्यांना घर न मिळाल्याने अखेर त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. कमला लॅण्ड मार्क ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित रिअल इस्टेट कंपन्यांनी याआधी वर्सोवातील एका व्यावसायिकाचीही साडे सहा कोटींची फसवणूक केली आहे. पोलिसांनी नायर आणि रवी किशनची तक्रार एकत्र करून कमला लॅण्ड मार्क ग्रुपच्या जीतेंद्र जैनसह आणखी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे कमला लण्डमार्क कंपनीविरोधात फसवणुकीचा हा 24 वा गुन्हा आहे. पोलिसांनी कमला लॅण्ड मार्क ग्रुपवर आतापर्यंत फसवणुकीचे 24 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या सारख्या गुन्ह्यांमध्ये या बांधकाम व्यावसायिकांनी 250 हून अधिक जणांची 300 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोफा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.